परळी मध्ये मोठ्या ज्वेलथिफचा पोलीसांनी केला करेक्ट कार्यक्रम

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी दिनांक 19 जानेवारी 2025 बीड जिल्ह्यातील आंम्बाजोगाई व परळी येथील पाच घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार व चोरीत पटाईत असणाऱ्या मोहन दौलत मुंडे याला बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज सापळा रचुन शिताफीने परळीतून जेरबंद केले आहे
यावेळी त्याच्या कडून चोरलेले दाग दागिने मिळुण एकुण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे दरम्यान सदरील अट्टल चोर मोहन मुंडे हा चोरीचे सोने विकण्यासाठी परळी वैजनाथ येथील मार्केट मध्ये आला आसता पोलीसांनी त्याचा सापळा रचुन करेक्ट कार्यक्रम केल्याची माहिती आहे