बीड

शेतकऱ्यांची कोंडी फुटणार !! पाणंद रस्ते मोकळे होणार, आदेश जारी

Panand roads have been cleared, District Magistrate's order to Gram Panchayats and Panchayat Samiti Press Note issued

प्रेसनोट- खबरदार पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण कराल किंवा रस्ता आडवाल तर !! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीनां आदेश जारी…

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 26जानेवारी2026 बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील शेत/पाणंद रस्त्यांच्या मजबुती करणासाठी पूर्णपणे यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती असलेली

“मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना” ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

सदर योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, स्थापन करण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिकारी यांना तालुकास्तरावर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस्थापन करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच शासन निर्णयातील सुचनेनुसार कार्यवाही करुन अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

प्रकरणात सर्व यंत्रणा गटविकास अधिकारी, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांना सदर योजना प्रभावीपणे राबवीण्याबाबत दिनांक 12/01/2026 रोजी मा.जिल्हाधिकारी बीड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करून आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

आज दिनांक 26/01/2026 रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” अंतर्गत बीड जिल्ह्यातील एकूण 56 पाणंद रस्ता, गाव रस्ता, शिव रस्ता खुला करून सिमांकन करून देण्यात आलेले आहे.

तसेच सदर ग्रामपंचायत यांना सदर रस्त्याचे मजबूती करण करण्यासाठी ग्रामसभेमधे ठराव घेऊन प्रस्ताव तालुकास्तरावर विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्या बाबत सूचना दिलेल्या आहेत.

मा. जिल्हाधिकारी बीड यांचे कडून सर्व शासकीय कंत्राटदार आय यंत्र मालक अवगत करण्यात येते की,

शासनाकडून दि. 28/01/2026 रोजी सदर योजणेकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून

यामध्ये जास्तीतजास्त कंत्राटदारांनी व यंत्र मालकानी सहभाग नोंदवून निविदा भरावी

बीड जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना जि.बीड यांना आवाहन करण्यात केले आहे की,

आपल्या गावातील रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमीत असतील तर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तहसीलदार यांचे कडे संपर्क करावा.

आणि अतिक्रमण मुक्त सिमांकन झालेल्या पाणंद रस्त्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या कडून काढण्यात आले आहेत

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!