
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 8 एप्रिल 2026 बीड जिल्ह्यातील तहसील, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनात भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांनी कहर केला आहे मागील काही दिवसांपासून लाचलुचपत विभागाने मनावर घेतल्याने बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ठिकाणी रेड टाकण्यात येत आहे हि बाब सामान्य नागरिकांच्या दृष्टीने समाधानकारक आहे
आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी केज आणि परळीतील महसूलमधील अनुक्रमे दोन जणांना लाच घेताना पकडल्यामुळे भ्रष्ट कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली आहे.
पहिली कारवाई केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील तलाठीवर करण्यात आली. वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी थेट ३९ हजारांची मागणी केल्यानंतर त्यात तडजोड करून ३५ हजार ठरले. आणि यातील ९ हजार रुपये स्वीकारताना परमेश्वर जाधवला एसीबीने रंगेहात पकडले.
ही कारवाई डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले, बीडकर, सुरवसे, पुरी यांच्या टीमने केली.
तर दुसरी कारवाई पिंपळगाव गाडे तालुका.परळी येथील अतिरिक्त पदभार असलेल्या दशरथ देविदास गोरे वर करण्यात आली आहे
जलसिंचन विहिरीत १ हजाराची मागणी करून त्यातील ५०० रुपये घेताना आरोपी ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरील कारवाई समाधान कवडे, शेळके, गवळी, काळे, मेहत्रे व इतरांच्या वतीने करण्यात आली आहे यामुळे केज आणि परळीतील तहसील व पंचायत समितीतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








