क्राईम

बीड जिल्ह्यात 60 लाखांचा धाडसी दरोडा, आरोपी गजाआड

Accused in daring robbery worth Rs 60 lakh arrested

तालखेड फाटा- माजतगाव येथे झालेता 60 लाखांचा दरोडा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह ज्वेलर्स दुकानात कारागिर म्हणून काम करणाऱ्या इसमास अटक व त्यांचेकडून 18 तोळे सोने व 1 किलो चांदी जप्त.

दिनांक 25/01/2026 रोजी माजलगाव येथील सोनार दुकानदार श्री. अमोल पंढरीनाथ गायके वय 31 वर्षे, रा. भाट वडगाव ता. माजलगाव हे त्यांचे माजलगाव येथील अमोल सोन्याचे दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्यांचे हिरो होंडा पेंशन मोटार सायकलवर पुतण्यसाह जात असताना पाठीमागून स्प्लेंडर मोटार सायकलवर येऊन त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले.

गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना स्प्लेंडर तीन इसमांनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांचेकडील सोन्या-चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळून गेले. त्यावरून पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण गुरनं. 30/2026 कलम 309(4), 126 (2).3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला.

वरील प्रमाणे गुन्हा घडल्यापासून मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना आदेशीत केले की, सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.

तपासात तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर असे निष्पन्न झाले की,

यातील फिर्यादी गायके यांचा दोन मोटार सायकल ज्यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर व बजाज पल्सर ने माजतगाव शहरातून रेकी करून पाठलाग केला असून त्यांनी आपसात मोटार सायकलवर बसलेल्यांची अदला बदली करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

परंतु स्थानिक गुन्हे शाखेने यामध्ये बारकाईने तपास करून यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, यातील आरोपी हे सध्या बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आहेत.

त्यावरून पथकांनी सदर ठिकाणी जाऊन 1) एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले वय 35 वर्षे, रा. पाटोदा ता. परतूर जि.जालना ह.मु., पांडुरंग रेसीडेन्सी समोर, कैनाल रोड, बीड 2) कृष्णा तुकाराम निरडे वय 22 वर्षे, रा.पावर हाऊस रोड, माजलगाव जि. बीड 3) अभिषेक अशोक शिंदे वय 22 वर्षे रा. पावर हाऊस रोड, माजलगाव जि.बीड यांना ताब्यात घेतले.

सदर आरोपींतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अधिक विचारपूस करता एकनाथ कपाले यांनी सांगितले की, तो सोनार कारागिर असून त्याने पूर्वी माजलगाव येथे वेगवेगळे ठिकाणी कारागिरीचे काम केले होते व त्याला माजलगाव येथील सोनार दुकानदार यांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती.

तसेच तो सध्या खूप कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सोनार दुकानदार यास आठवडी बाजारास जाताना सुटण्याचे ठरिवले. त्यानुसार एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला.

त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र नामे 4) संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे वय 28 वर्षे, रा. उमरगा मन्ना ता. उदगीर जि.लातूर ह.मु. पुणे 5) विशाल सूर्यकांत सुळ रा. माजलगाव ह.मु. पुणे यांना सदर कटात सामील केले.

सदर आरोपींचे प्लॅन नुसार दिनांक 25/01/2026 रोजी हिरो होंडा स्प्लेंडरवर एकनाथ कपाले व संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यांनी फिर्यादी यांचे रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांचा सदर पाच आरोपीतांनी हिरो होंडा स्प्लेंडर व बजाज पल्सर वर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे.

सदर आरोपीतांचे ताब्यातून 18 तोळे सोन्याचे दागिने व 1 किलो चांदी असा एकूण 30,00,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे वय 28 वर्षे, रा. उमरगा मन्त्रा ता. उदगीर जि.लातूर यास देखीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे

व एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गोविंद पांडव माजलगाव ग्रामीण हे करीत आहेत.

सदरीत कामगिरी ही श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक,

स्थानिक गुन्हे शाखा, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुशांत सुतळे, महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, मारुती कांबळे, भागवत शेलार, राहूल शिंदे, दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, मनोज परझने, अशफाक सय्यद,

अर्जुन यादव, चालक पोह गणेश मराडे, नितीन वहमारे, अतुल हराळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड व TAC सेलचे पोलीस उप निरीक्षक शेखर औटे व विकी सुरवसे यांनी केली आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!