कांद्याचा खेळ खल्लास ! ऐन वेळेवर करेक्ट कार्यक्रम
कांद्याचा खेळ खल्लास ! ऐन वेळवर करेक्ट कार्यक्रम Khalla game of onion! Correct program on time

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 30 नोव्हेंबर 2024 – Onion Market Status नाशिक जिल्ह्यातील येवला, चांदवड,देवळा,नांदगाव तालुका हा ब्रिटिश कालीन पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. लाल कांद्याची red onion काढणी सुरू असून, उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात वातावरणात झालेल्या बदलाने लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन अर्ध्याने घटल्याचे पहावयास मिळते. लाल कांद्याला बाजारभाव Onion price चांगला मिळत असला, तरी उत्पन्नात झालेली घट लक्षणीय आहे.Khalla game of onion! Correct program on time
दुष्काळी पट्ट्यात लाल कांदा उत्पादनात अग्रेसर असणार्या या तालुक्याची ‘लाल कांदा चे आगार’ म्हणून ओळख निर्माण झाली होती. परंतु या वर्षी कांदा क्षेत्रात अर्ध्यापेक्षा जास्त घट झाली असून, गहू व हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, गावरान कांदा, लसूण व इतर चारा पिकांची पेरणी करण्यात आली आहे. गावरान कांद्याची लागवडही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु चालू वर्षी तालुक्यातील सर्व भागात मुबलक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावरान कांद्याची लागवड काही भागात लागवड सुरू आहे. गहू, हरभरा, कांदा, या पिकांना शेवटी पाणीटंचाई जाणवणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
विविध तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले तर ते आटलेही कारण मोठ्या प्रमाणात क्षेत्रात कांदा लागवड झाली. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्वच पिकांना काही भागांत पाण्याची टंचाई जाणवणार असून, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हाती येते की नाही याबाबतही शेतकर्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यात जानेवारी-फेब्रुवारीत तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाई जाणवणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, या पिकांसाठी पोषक वातावरण असून, गावरान कांदा व लसूण या पिकांवर अचानक पडलेल्या थंडी व ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. गावरान कांदा, लसूण या पिकांवर मावा, तुडतुडे, मर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अचानक पडलेल्या थंडीमुळे पिकांची वाढही खुंटल्याचे पहावयास मिळते.
जानेवारीमध्येच पाणीटंचाई जाणवणार!
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके हे कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून राज्यात ओळखला जातात. परंतु विविध तालुक्यातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर काही भरलेच नाही. त्यामुळे जानेवारीमध्येच पाणीटंचाई जाणवणार आहे.
रोगाचा प्रार्दभाव
लाल कांदा ज्या ठिकाणी लागवड करण्यात येते त्यावेळेस पावसाचे प्रमाण असतं आणि पाऊस आणि आकाशात ढग असल्यामुळे कांद्यावरती रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हा प्रादुर्भाव रोखणं शेतकऱ्यांसाठी अवघड जात यंदाही तसेच झालं लाल कांद्यावरती मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला हा हबु, अळी यांनी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात आक्रमण केलयं. यामुळे कांदा पिकामध्ये मोठी घट निर्माण झाली आहेय. कांद्याचे भाव सध्या जरी चांगल्या प्रमाणात असतील तरी शेतकऱ्यांकडे कांदा पाहिजे त्याप्रमाणे उपलब्ध नाही. त्यामुळे यावर्षी लाल कांद्याचा खेळ खल्लास झाल्यात जमा आहे.
