क्राईम

शिवजयंती मध्ये गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या

The goons carrying village knives in the Shiv Jayanti procession in Ashti, smiling with a smile

दिनांक: 20/02/2026 वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे बीड

दि. 19/02/2026 रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 निमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू होती.

सदर पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. शरद भुतेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की,

ब्रम्हगाव परिसरात काही अनोळखी इसम पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनातून पिस्टलसह फिरत आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी संबंधित इसमांचा व गाडीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस स्टाफला दिले.

त्या अनुषंगाने पोलीस स्टाफ डायल 112 वाहनाने ब्रम्हगावकडे रवाना झाले. रात्री सुमारे 20.50 वा. आष्टी-ब्रम्हगाव रोडलगत पांढरी शिवार येथील हॉटेल जय भवानी समोर पांढऱ्या रंगाची ग्रैंड व्हिटारा कार क्र. 25BH9118A ही संशयास्पद स्थितीत आढळून आली.

सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये तीन इसम आढळले. पोलीसांनी स्वतःची ओळख देऊन त्यांना खाली उतरविले. तपासणीदरम्यान वाहनातील एका काळ्या रंगाच्या बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये पुढील प्रमाणे बेकायदेशीर अग्नी शस्त्र मिळून आली

1. एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल (कट्टा) – अंदाजे किमत ₹50,000/- 2. एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल (कट्टा) (मॅगझीनसह) अंदाजे किंमत ₹50,000/- एकूण मुद्देमाल किंमत अंदाजे ₹1,00,000/-दरम्यान, वाहन चालक दत्ता महादेव पोकळे रा. मुगगाव ता. पाटोदा हा वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला असून सदर वाहन हे मुगगाव परिसारात सोडुन पसार झाला आहे.

सदरचे वाहन त्याचदिवशी पोलीसांमार्फत पोलीसांग शोध घेऊन जप्त केले आहे.

सदर फरार इसमाचा शोध सुरू आहे. सदर घटनास्थाळावरुन 1. राहुल कल्याण खोटे, रा. मुगगाव ता. पाटोदा जि. बीड 2. भरत ऊर्फ आमृत बाबासाहेब भोसले, रा. पारगाव घुमरा ता. पाटोदा जि. बीड यांना ताब्यात घेतले आहे.

सदर इसमांनी संगनमताने विनापरवाना बेकायदेशीररीत्या शत्र बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध Arms Act. 1959 अंतर्गत कलम 3 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक बीड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग आष्टी यांचे मार्गदर्शानाखाली करण्यात आली असुन सदर घटनेचा पुढील तपास पोउपनि श्रीकृष्ण शिंदे पोलीस स्टेशन आष्टी हे करत असुन सदर घटनेतील एक फरार आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करते की, बेकायदेशीर शाखां विषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावी.श्री.शरद भुतेकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांनी आवाहन केले आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!