क्राईम

परळीची म्हता न्यारी !! अल्पवयीन पोरं करत होते बाईक चोरी

Minor boys from Parli city turn out to be bike thieves

विधीसंघर्ष बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत दोन गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची कामगिरी.

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 1 एप्रिल 2026 परळी शहर पोलीस स्टेशन गुरनं. 18/2026 कलम 303(2) भा.न्या.सं. अंतर्गत दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहीती मिळाली की सदरील गुन्हा हा एका विधीसंघर्ष बालकाने केला आहे,

सदरील विधीसंघर्ष बालकाचे राहते घरी जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला.

त्याचेकडे सदरील गुन्हयातील एक दुचाकी व ईतर दोन असे एकुन तीन दुचाकी मिळुन आल्या, विधीसंघर्ष बालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर तीनही मोटार सायकली परळी परीसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

त्याचे ताब्यातुन एक स्कुटी व दोन मोटार सायकल अश्या एकुण तीन दुचाकी जप्त करून पुढील तपासकामी पोलीस ठाणे परळी शहर यांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.

सदरील मिळालेल्या दुचाकीवरुन पोलीस ठाणेचा अभीलेख पडताळणी केली असता खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.

1. परळी शहर पोलीस स्टेशन गुरनं. 18/2026 कलम 303(2) भा. न्या.सं.

2. संभाजीनगर पोलीस ठाणे, गुरनं 69/2026 कलम 303(2) भा.न्या.सं.

सदरील कामगिरी ही श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड,

यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सुशांत सुतळे, विष्णु सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, मारोती कांबळे, दिलीप गिते, विकास राठोड यांनी मिळून केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!