धाराशिव जिल्हयातील इसमाची बीडमध्ये आत्महत्या

सदरील गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाची ओळख पटली आसुण. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झालेला आहे मयत इसम यांचे नाव लक्ष्मण काशिनाथ डुमणे वय 65 वर्ष राहणार कसबे तडवळे तालुका जिल्हा जिल्हा धाराशिव येथील आसल्याचे मृताच्या कुटुंबीयाकडुण सांगण्यात आले ..
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड- दिनांक 10 फेब्रुवारी बीड तालुक्यातील मांजरसुंबा जवळील कोळवाडी घाटात गळफास घेतलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळुन आला होता
सविस्तर- बीड तालुक्यातील कोळवाडी घाटात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून
सदरील मयत इसमाजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले होते
सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर दरम्यानच्या कालावधीत संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क झाला आहे पुढील तपास बीड ग्रामिण पोलिस करत आहेत…