24 व्या वर्षी युवा उधोजकचा बहुमान पटकावणाऱ्या प्रतिक आघाव यांच्या यशाचा डंका साता समुद्रापार

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी- 3-१२-२०२४ – मराठवाड्यातील बीड सारख्या सतत दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील परळी सारख्या छोट्या शहरात आणि परळीचे पुर्वीचे बाजारपेठेचे गतवैभव संपलेल्या काळांत… सारडगांव,नंदनंज,सारख्या ग्रामिण भागातील खेडेगावातुन शहरात येऊण व्यवसायाचा कोणताही वसा आणि वारसा किंवा अनुभव नसलेल्या सामान्य कुटुंबातील मधुकर आघाव यांनी स्वबळावर परळी शहरातील व्यवसायात पहिले पाऊले टाकले,त्याचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे ,
फक्त व्यवसाय हेच जिवणाचे अंतिम लक्ष्य नाही असे ठणकाऊण सांगणाऱ्या प्रा.ड्रॉ.आघाव सरांना सामाजिक,शैक्षणीक,आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातुन जनसेवेची आवड असल्यामुळें एम.ग्रुप ची धुरा त्यांनी प्रतिक आघाव या त्यांच्या मुलावर सोपवली, “माशाच्या पिल्लांना पोहण्याच्या प्रशिक्षणाची गरज नसते” हि म्हण सार्थ ठरवत,शिक्षणा सोबत वडिलांनी व्यवसायाची टाकलेली जबाबदारी देखील यशस्वी रित्या सक्ष्मपणे प्रतिक आघाव हे सांभाळत आहेत..
इ.स.2000 साली जन्म झालेल्या 24 वर्षे वयाच्या या यशस्वी युवा उधोजकचे शिक्षण MBA L.L.B परिपुर्ण झालेले असल्यामुळें उधोग व्यवसायातील बारकावे तपासुण व्यस्थापणाचे निर्णय हे इतरांवर अवलंबुण न राहता ते स्वतः सक्ष्म आहेत तर संपुर्ण कार्यक्षमतेने स्वतःस व्यवसायात झोकुण घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांसह पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकां सोबतचे संबंध कसे जपावे लागतात या गोष्टीत पारंगत असणे हे कारण देखील प्रतिक आघाव यांच्या यशास पुरक ठरले आहेत
लोकमत उधोग समुहाच्या निरिक्षकांनी व्यवसायीतील टापटीप पणा व्यवहाराची पारदर्शता ग्राहकांप्रती असलेला प्रामाणीकपणा,कर्मचाऱ्यांप्रती असलेली व्यवस्थापानाची अर्थिक बांधिलकीची जपणुक,याच बरोबर अनेक व्यवसाय असुण देखील प्रत्येक व्यवसायातील क्वालिटी आणि क्वांटिटी या सर्व बाबींचा अभ्यास करुन पुरस्कार देण्याचे निकष लागु झाल्यामुळे –Lokmat one world summit and awards 2024 baku -Azerbaijan 5 December 2024. लोकमत ग्लोबल इंडस्ट्रीज अवॉर्ड. परळी चे उद्योजक प्रतीक मधुकर आघाव यांना जाहीर झाला आहे —
5 डिसेंबर 2024 रोजी AZERBAIJAN या देशातील बाकु या ठिकाणी हा पुरस्कार दिला जाणार आहे
लोकमत उधोग समुहा कडुण दिल्या जाणाऱ्या उधोग क्षेत्रातील पारितोषिका साठी परळी वैजनाथ जि.बीड येथील प्रा.डॉ मधुकर आघाव सरांच्या एम ग्रुपचे एमडी प्रतिक आघाव यांची युवा उधोजक पारितोषिका साठी निवड झाली आहे,
दरम्यान त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परळी परिसरातील ग्राहक,आणि नागरीकांडुण प्रतिक मधुकर आघाव यांच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे….