बीड येथील 4 वर्षापूर्वीच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा

वेगवान मराठी बीड -केशव मुंडें
बीड- प्रतिनिधी- दि 12 12 24 : इ.स.2020 साली पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन बॅट व दगडाने तिच्या व मुलांच्या डोक्यात आणि दुसऱ्या मुलास पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून तिघांचा खून करणाऱ्या संतोष जयदत्त कोकणे (रा. तकवा कॉलणी, शुक्रवार पेठ, बीड) या नराधमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
प्रस्तुत प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २४/०५/२०२० रोजी पहाटे ०४.०० वाजणेचे सुमारास संतोष जयदत्त कोकणे याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी संगिता संतोष कोकणे (वय ३५ वर्ष) व मुलगा सिद्धेश संतोष कोकणे (वय १० वर्ष) या दोघांना त्यांच्या डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर गुखापत करून त्यांचा खून केला. त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश (वय ८ वर्ष) याच्या डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध करून पाण्याचे बॅरेलमध्ये पाण्यात बुडवून ठार मारले. याप्रकरणी आरोपी संतोष कोकणे याच्या विरुध्द कलम ३०२ भा.द.वि प्रमाणे पो. स्टे पेठ बीड येथे गु.र.नं. १५०/२०२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पेठ बीड पो.स्टे चे तपासी अधिकारी यांनी केला. त्यांनी सदर प्रकरणात तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरण नंतर जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे सुनावणीसाठी वर्ग झाले.
सदर प्रकरणाचा साक्षीपुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद एल. यावलकर साहेब यांच्या समोर झाली. सदर प्रकरणात आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकुण १५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादीचा जबाब/ इतर साक्षीदारांचे जबाब व इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन करून व सहा. सरकारी वकिल अॅड. भागवत एस राख यांचा युक्तिवाद ग्राहय धरून सदरचे प्रकरण हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असून आरोपीस फाशी देणे इतपत गंभीर आहे हा युक्तिवाद ग्राहय धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी प्रकरणातील आरोपी संतोष जयदत्त कोकणे यास दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे -+-
वेगवान मराठी-अपडेट बीड महाराष्ट्