परळीचा ईंजनियर बनला थेट दुबईच्या बुलेट ट्रेनचा मैनेजर

परळीच्या शिरपेचात आणखीन एक तुरा
इंजि.राजू जगतकर दुबई येथे निवड
वेगवान मराठी केशव डि.मुंडे दि- १४ फेब्रुवारी 2025 परळी प्रतिनिधी – परळीचे भूमिपुत्र इंजि. राजू श्रावणराव जगतकर, अपर्णा जगतकर,व संपादक बालाजी जगतकर यांचे छोटे बंधू ज्यांची दुबई येथे बुलेट रेल्वेच्या ऑपरेशन मॅनेजर पदी निवड झाली. त्यांनी दिल्ली व मुंबई येथे वेगवेगळ्या पदावर मेट्रो रेल्वेचे काम पाहिले आहे. अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून मुंबई मेट्रो येथे काम करण्यासाठी प्रेरित केले आहे.
ते येत्या 14 फेब्रुवारी रोजी दुबई येथे प्रत्यक्ष कामावर रुजू होत आहेत. त्यांची निवड झाल्याबद्दल मित्र परिवार व आप्त स्वकीयांकडून सत्कार व विदेशात जाणार आहेत,
त्यानिमित्ताने निरोप समारंभ प्रसंगी शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे, राजेश साखरे सहशिक्षक वैद्यनाथ विद्यालय, रामकिशन सावंत, प्रमोद सावंत, श्रावणराव जगतकर, बालाजी जगतकर सिद्धार्थ जगतकर आदी दिसत आहेत.