सुजित सोनी यांचे हल्लेखोर तेजस तुरकमारे आणि कृष्णा मुंडे गजाआड

वेगवान मराठी आंबाजोगाई -K.D.MUNDE-दिनांक 17/01/2025
( स्थानिक गुन्हे शाखा बीड ची उल्लेखणीय कामगिरी )
अंबाजोगाई शहरात व्यापाराऱ्यास कोयत्याने वार करुन सोन्याच्या अंगठी व मोबाईल बळजबरीने लुटणाऱ्या टोळीला स्था.गु.शा.बीड ने 24 तासाचे आत केले जेरबंद !
फिर्यादी सुजित श्रीकृष्ण सोनी व्यवसाय-व्यापार रा.ओमशांती कॉलनी अंबाजोगाई हे दिनांक 15/01/2025 रोजी रात्री 21.00 वा. सुमारास रेस्ट हाऊसजवळ अंबाजोगाई येथे अज्ञात आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादी यांचे पाठीमागुन कोयत्याने अचानकपणे डोक्यात वार करुन व उजव्या हातावर वार करुन मधले बोटास गंभीर दुखापत करुन हातातील सोन्याची अंगठी व वन प्लस कं. मोबाईल असा मुद्देमाल जबर मारहाण करुन जबरीने चोरुन नेला होता
त्यावरुन पो.स्टे.अंबाजोगाई शहर येथे गुरनं 26/2025 कलम 311, 3/5 BNS प्रमाणे दिनांक 16/01/2024 रोजी 01.02 वा. गुन्हयाची नोंद करण्यात आली.
सदर गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन पो.नि. श्री. उस्मान शेख, यांनी पोउपनि सुशांत सुतळे यांना केले त्यावरुन पोउपनि सुशांत सुतळे यांनी आपल्या पथकासह अंबाजोगाई शहरात गुन्हे भेट देवुन आरोपी शोध घेण्यासाठी रवाना होवुन गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली.
दिनांक 16/01/2024 रोजी पोउपनि सुतळे व त्यांचे पथक नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमी मिळाली की, सदरचा लुटीचा प्रकार हा 1) तेजस तुरुकमारे, 2) कृष्णा दत्ता मुंडे व इतर एक साथीदार यांनी मिळुन केल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा लागलीच संशयीत इसमांचा शोध घेण्यास सुरुवात करुन त्यांना शासकीय विश्रामगहाकडे जाणाऱ्या रोडवर विनानंबरच्या मोटारसायकलसह पथकाने पकडले.
त्यांनी त्यांची नावे 1) तेजस अनिल तुरकमारे वय 18 वर्षे, रा. स्नेहनगर अंबाजोगाई, 2) कृष्णा दत्ता मुंडे वय 18 वर्षे रा. राजीव गांधी चौक अंबाजोगाई व इतर एक अल्पवयीन बालक असे कळविले आहे
त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांना यातील फिर्यादी व्यापाऱ्याची माहिती ही त्यांच्यात दुकानातील कामाला असलेला अनिकेत मगर याने दिली होती व सदर व्यापाराऱ्याकडे नेहमी त्यांचे स्कुटीच्या डिग्गीमध्ये पैसे असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार सर्वांनी मिळुन यातील फिर्यादी व्यापरी यांना मारहाण करुन लुटण्याचा प्लान केला. दिनांक 15/01/2025 रोजी ठरलेल्या प्लान नुसार अनिकेत मगर याने व्यापारी सुजित सोनी दुकान बंद करुन स्कुटीवरुन निघाल्याची टिप यातील वरील आरोपींना दिली
त्यानंतर त्यांनी त्यांचे मोटार सायकलवरुन पाठलाग करुन व्यापारी सुजित सोनी हे आण्णा भाऊ साठे व्यापारी संकुल येथे गाडी उभी करुन तेथील कट्टयावर बसले तेव्हा त्यांच्या जवळच्या अंतरावर गाडी उभी करुन कृष्णा मुंडे याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने अचानक पाठीमागुन येवुन व्यापाऱ्याचे डोक्यात वार केले व खाली पाडुन इतरांनी हातातील अंगठी व मोबाईल जबरीने लुटून तेथुन तीघे जन पळुन गेले.
आरोपीचे ताब्यातुन एक सोन्याची 6 ग्रामची अंगठी , वन प्लस कं.मोबाईल व गुन्हयात वापरलेली विनानंबरची यमाहा कं.स्पोर्ट बाईक असा एकुण 113760/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तीन आरोपींना ताब्यात घेवुन पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे हजर केले आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. नवनीत काँवत पोलीस आधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई चेतना तिडके, पो.नि. श्री.उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, पोह/मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, विकास राठोड, विष्णु सानप, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, चालक नितीन वडमारे नेम.स्था.गु.शा.बीडयांनी मिळुन केली आहे.
जाहिराती साठी संपर्क वेगवान मराठी केशव मुंडे 8888 387 622 परळी बीड