सोशल मिडीया वरील अक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

समाजमाध्यम (Social media) यावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणारे समाजकंटक यांचेविरुध्द सायवर पोलीस ठाणे, बीड येथे एकाच दिवसात 03 गुन्हे दाखल.
वेगवान मराठी -बीड प्रतिनिधी दिनांक 9 मार्च 2025 सोशल मिडीयावर (फेसबुक, इंन्स्टाग्राम, X, वॉटसअॅप, टेलीग्राम, ई.) सार्वजणीक मालमत्तेचे नुकसान व जिवतीस धोका निर्माण होईल या उद्देशाने तसेच दोन भिन्न गटातमध्ये शत्रुत्व वाढुन एकोपा टिकण्यास बाधक होईल या उद्देशाने प्रक्षोभक भडकाऊ व आक्षेपार्ह मजकुर (पोस्ट) प्रसारित केला आहे. आक्षेपार्ह मजकुर (पोस्ट करणारे) प्रसारित करणारे समाजकंटक यांनी केलेल्या गैरकृत्याची गंभीरतेने दखल घेण्यात आली असुन
त्यांचे विरुध्द सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे 1) गुरनं 12/2025 कलम 57, 192, 196 BNS सह कलम 66 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2) गुरनं 13/2025 कलम 57, 192, 196 BNS सह कलम 66 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 3) गुरनं 14/2025 कलम 57, 192, 196 BNS सह कलम 66 माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हे नोंद झाले आहेत.
नमुद गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री विश्वंवर गोल्डे साहेब यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास गात, सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सर्व समाजातील सुजान नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही अफवावर व वेगवेगळ्या समाजमाध्यमांतुन प्रसारित होणाऱ्या खोटया व द्वेषमुलक, सामाजिक सौदाई, शांतता बिघडवणा-या बातम्यावर विश्वास ठेवु नये, अशा प्रकारे खोडसाळ, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास त्यांचेवर गुन्हे नोंद करुन कायदेशिर कठोर कारवाई करण्यात येईल,
सायबर पोलीस ठाणे व बीड जिल्हा पोलीस सोशल माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे समाजकंटक यांचेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.