परळी आंदोलन प्रकरणी कायदा हातात घेणारांवर होणार गुन्हे दाखल

वेगवान मराठी परळी -K D MUNDE –प्रेस नोट दि. 14/01/2025 :- कायदा हातात घेणारांवर होणार गुन्हे दाखल-पोलीस अधिक्षकांचे आदेश
मस्साजोग ता. केज येथे घडलेल्या घटनेवरुन दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असतांना आज दिनांक 14/01/2024 रोजी 13:30 ते 15:00 वा. दरम्यान परळी बीड रोडवर पांगरी कॅम्प, वान नदीचे पुलावर व टोकवाडी तसेच कन्हेरवाडी येथील नदीचे पुलावर सार्वजनीक रस्त्यावर वाल्मीक कराड यांचे समर्थनार्थ कोणीतरी अज्ञात इसमांनी टायर जाळुन सार्वजनीक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणुन पोलीस स्टेशन परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री. सय्यद, सपोनि. अनमोल केदार, सपोनि श्री. समाधान कवडे व त्यांचे स्टाफ यांनी तात्काळ दखल घेवुन सार्वजनीक वाहतुक सुरळीत करुन आरोपींविरुद्ध कलम 126 (2) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे गुन्हे नोंद केलेले असुन सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच परळी शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर सार्वजनीक रस्त्यावर परळी ते संगम जाणारे रोडवर वाल्मीक कराड यांचे समर्थनार्थ कोणीतरी अज्ञात इसमांनी टायर जाळुन सार्वजनीक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणुन पोलीस निरीक्षक श्री. धनंजय ढोणे व त्यांच्या स्टाफने तात्काळ दखल घेवुन सार्वजनीक वाहतुक सुरळीत करुन आरोपीविरुद्ध कलम 126 (2) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे गुन्हे नोंद केलेले असुन सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
तरी परळी शहर व परीसरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, मा. जिल्हाधीकारी बीड यांचे आदेश जा.क्र. 2023/गृह विभाग/प्र.कार्यवाही/1/1/म.पो.अ. कलम 1951/14 प्रमाणे दिनांक 13/01/2025 रोजीपासुन जमावबंदी आदेश लागु झालेले असुन त्याचे उल्लंघन करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी
WEGWAN MARATHI PARLI BEED MAHARASHTRA 8888 387 622