बीडच्या त्या प्रकरणातील 3 आरोपींना सिनेस्टाइल अटक

वेगवान मराठी केशव मुंडे –दिनांक 19/12/2024
( स्थानिक गुन्हे शाखा बीडची उल्लेखणीय कामगिरी)
पेठ बीड हद्दीत गावठी पिस्टलने फायरील करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 03 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
******************************************
दिनांक 13/12/2024 रोजी 02.00 वा. सुमारास फिर्यादी अभिशेक विश्वास डोंगरे, रा. प्रकाश आंबेडकरनगर बार्शी नाका पेठ बीड यांचे राहते घरी आरोपी अक्षय शामराव आठवले, 2)मनिष क्षीरसागर व इतर आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन मागील भांडण्याचे कारणाचा राग मनात धरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन आरोपी विरुध्द पो.स्टे.पेठ बीड येथे गुरनं 383/2024 कलम 109,191(2),191(3),190,61(2),115(2),352,351(2) BNS, सह कलम 3/25 भारतीय शस्त्र अधिनियम व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दिनांक 13/12/2024 रोजी गंभीर गुन्हयाची नोंदी झाली होती. गुन्हा घडल्यापासुन गुन्हयातील आरोपी हे फरार होते त्यांचा शोध घेवुन अटक करण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांना दिले होते.
सदर गुन्हयाचा प्रथम तपास पो.स्टे. पेठ बीड यांनी केला त्यानंतर सदर गुन्हा गंभीर व रेकॉर्डवरील आरोपींनी केलेला असल्याने यांची गंभीरता लक्षात घेता मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी सदर गुन्हयाचा तपास श्री. उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे दिला. पो.नि. श्री.उस्मान शेख यांनी आरोपीला शोध घेण्यासाठी तपासाची चर्के फिरवले. गोपनिय बातमीदार खबऱ्यांची नेटवर्क एक्टीव केले. त्यातच पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे यांचे पथकाला वरील गुन्हयातील फरार आरोपी 1) अक्षय आठवले व 2) मनिष क्षीरसागर हे पुणे येथे लोणीकंद भागातील गोळेगाव शिवारात एका शेतामध्ये कच्चा बांधकाम असल्याचे ठिकाणी बसलेले आहेत अशी माहिती मिळाली,सदर आरोपी हे कुख्यात आहेत ते नेहमी गावठी कट्टे गावठी पिस्टल सोबत घेवुन भिरत असतात. त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर ते पोलीसांवर सुध्दा फायरींग करण्यास मागे पुढे बघनार नाही या सर्व गोष्ठींचा पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांनी विचार करुन त्यांनी पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे व पथकाने योग्य ती खबरदारी घेवुन बातमी ठिकाणी सापळा लावयाला सांगितले. पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे, पोउपनि विघ्ने व पथकाने सापळा लावून आरोपीवर झडप टाकली असता आरोपी पळुन जात असतांना त्यांचा पाठलाग करून एकास पकडले व दुसरा ऊसाचे शेतात पळाला तेव्हा त्याचा ऊसाचे शेतात पाठलाग करून पकडून त्याब्यात घेतले आहे. आरोपी अक्षय आठवले व मनिष क्षीरसागर यांना पकडल्यानंतर त्यांचेकडुन गुन्हयांचा सर्व घटनाक्रम समजला त्यात त्यांचे सोबत ओमकार सवई गुन्हयात सामील असल्याची माहिती मिळाल्याने लगेच त्वरीत मध्यरात्री ओमकार सवई यास बीड येथुन पकडले. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड, पोउपनि श्री.सिध्देश्वर मुरकूटे, पोउपनि श्री. महेश विघ्ने, पोह/मनोज वाघ, राहुल शिंदे, पोना/विकास वाघमारे, अश्विनकुमार सुरवसे, चालक राऊत यांनी मिळुन केली आहे.