बीड जिल्ह्यातील सरपंचाचा दिवसा ढवळ्या खुन

-वेगवान मराठी केशव मुंडे -वेगवान मराठी परळी -(प्रतिनिधी केज) -दि-9/122/024 केज कडुण आपल्या गावाकडे निघालेल्या सरपंचास पाठलाग करत रस्त्यामध्ये गाडी आडवुण फोरव्हिलरची काच फोडुण गाडी बाहेर काढुण अपहरण करण्यात आले आसल्याचे माहिती अपहरण करण्यात आलेल्या सरपंचांच्या ड्रायव्हर शिवराज देशमुख यांनी केज पोलिसात देऊण अज्ञातां विरोधात तक्रार दाखल केली होती..
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक शिवराज देशमुख हे चारचाकी गाडीतून केज येथुन मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला
संतोष देशमुख सरपंच राहिलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत ला शासणाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे केज तालुक्यासह आंबाजोगाई आणि आसपास च्या तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटणे मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अपहरण करुण केलेल्या खुनाचा तपास पोलीस निरिक्षक महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस करत आहेत.