ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणातील आरोपी सुरेश कुटेला ग्राहक मंचाचा हाबाडा

वेगवान मराठी परळी दि.२६/११/२०२४ ठेविदारांच्या ठेवींवर डल्ला मारणाऱ्या सुरेश कुटेला ग्राहक मंचाकडुण ठेवीदारांच्या तक्रारी वरुण रितसर नोटीस पाठविली आसुण फरार आसलेल्या सुरेश कुटे,अर्चना कुटेसह ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील संबंधीतांना सतत पत्ता बदलणे आणि न्यायालयीन तारखांना उपस्थित न राहिल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड यांच्या कडुण जाहीर प्रगटनाद्वारे नोटीस पाठवुण अंतीम संधी देण्यात आली आहे या नोटीशीची दखल घेण्यात आली नाही तर पुढील योग्य ती सख्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
तक्रार क्र :-४७८/२०२४
अर्जदार :- राधेशाम सिताराम मुसळे, सुहास राधेशाम मुसळे
विरुद्ध
गैरअर्जदार :- १) सुरेश ज्ञानोबा कुटे, अध्यक्ष, चेअरमन, ज्ञानराधा मल्टीस्टेट
को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या पाठीमागे, बीड ता. जि. बीड, निवासी पत्ता-चमडा फॅक्टरीच्या बाजूस एम.आय.डी.सी. बीड ता.जि.बीड, २) आशिष पदमाकर पाटोदकर, कार्यकारी संचालक, ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या पाठीमागे, बीड ता.जि.बीड, निवासी पत्ता-चमड फॅक्टरीच्या बाजूस एम.आय.डी.सी.बीड ता.जि.बीड, ३) यशवंत व्ही. कुलकर्णी, व्हाईस, चेअरमन, ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या मागे, जालना रोड, बीड ता. जि. बीड, ४) नारायण सुगंधराव शिंदे, जनरल मॅनेजर, ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या पाठीमागे, जालना रोड, बीड ता.जि.बीड, ५) श्रीराम सुशिलि हाडुळे, कार्यकारी अधिकारी, ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या मागे, जालना रोड, बीड ता.जि.बीड, ६) श्रीकांत आबासाहेब आमटे, उपकार्यकारी अधिकारी, ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, कार्यालय, ज्ञानराधा भवन जालना रोड, होंडा शोरुमच्या मागे, जालना रोड, बीड ता.जि.बीड, ७) भुसारी, शाखाधिकारी, ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, शाखा जालना रोड, ता.जि.बीड.
वर नमुद तक्रारदार यांना विरुद्ध पक्ष यांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यान्वये वर नमुद तक्रार दाखल केलेली आहे. यातील विरुद्ध पक्ष यांना नोटीस पाठविली असता ते स्विकारत नाही/पत्ता बदल झाल्यामुळे मिळून येत नाही. म्हणून तक्रारदारांनी केलेल्या विनंतीनुसार या जाहिर नोटीस द्वारे आपणास कळविण्यात येते की, विरुद्ध पक्ष यांनी वर नमुद या आयोगाच्या पत्त्यावर दि.२६/१२/ २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता स्वतः अगर वकिल किंवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून आपला लेखी जबाब, पुरावा व प्रतिज्ञालेख दाखल करावेत. जर विरुद्ध पक्षांची याकामी कसूर केल्यास मा. आयोगाद्वारे एकतर्फी आदेश पारित करण्यात येवून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दखल घ्यावी.
मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बीड यांची आदेशानुसार