वैद्यकिय क्षेत्रा बरोबर पत्रकारीता,साहित्य आणि संशोधन क्षेत्रात करिअर करा-ड्रा.उघाडे

बीड/ प्रतिनिधी केशव मुंडे वेगवान मराठी दिनांक -१७-१०-२०२४
 आपल्या देशातील बहुतांश हुशार विद्यार्थ्यांचा कल फक्त वैद्यकीय क्षेत्राकडे असल्याचे दिसून येते ,  साहित्य , अभियांत्रिकी , पत्रकारिता , संशोधन असे अनेक क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे करिअर चांगले करू शकता. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील बहुतांश हुशारी विद्यार्थी पत्रकारिता आणि संशोधन या क्षेत्राकडे वळतात म्हणूनच अमेरिकेची प्रगती झपाट्याने झाली आहे. आपला सर्वांगीण विकास घडवून आणत असताना देशाचा विकास कसा साध्य होईल याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे . असे प्रतिपादन विविध स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके लिहिणारे लेखक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. नंदकुमार उघाडे यांनी केले. पिंपरगव्हाण रोड , बीड येथील श्री . श्री . रविशंकर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ. नंदकुमार उघाडे बोलत होते. पुढे बोलताना डॉ. उघाडे म्हणाले की , शाळा ही एक पवित्र संस्था असते तेथे विद्यार्थ्यांची मने सुसंस्कृत करण्याचे कार्य शिक्षक करत असतात . शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे चारित्र्य चांगले घडते , त्याची क्षमता वाढते आणि त्याच्या आयुष्याला आकार येतो. काहीतरी करून दाखवण्याची महत्वाकांक्षा सदैव आपल्या मनात असली पाहिजे . प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय , उद्दिष्ट मोठे ठेवून ते मिळवण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. सतत आपल्या बुद्धीचा विकास करत राहणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय असावे. इयत्ता आठवी पासूनच योग्य मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वाटचाल ठेवली तर यूपीएससी , एमपीएससी तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यश मिळवून  जिल्हाधिकारी ,  एसपी , तहसीलदार असे मनाचे व महत्त्वाचे पद मिळवून देशाची सेवा करू शकता. यासाठी अभ्यासातील सातत्य कायम ठेवणे महत्त्वाचे आहे . असेही डॉ. उघाडे म्हणाले. या  प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सूर्यवंशी मॅडम यांनी डॉ . नंदकुमार उघाडे यांचा सत्कार केला.  या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक सुहास सोनवणे यांनी केले.
Back to top button
error: Content is protected !!