अखेर भाजपच्या जिल्हाध्यक्षाने राजीनामा दिलाच

केशव मुंडे वेगवान मराठी परळी दि–२०/१०/२४
बीड भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्ष सत्तेमध्ये आसताना सर्वाधिक सत्तेचा उपभोग घेतला परंतु भाजपचे वासे फिरलेले दिसताच आज उद्या करित करित शेवटी आज भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप श्रेष्ठीसह पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील विकास कामासाठी निधी देत नसल्याचे आरोप केले आहेत..
2019 पासुण मि बीड विधानसभा मतदारसंघातुन लढण्यास इचछूक होतो आणि पंकजा मुंडे यांनी यावेळी उमेदवारीचा जाहीर शब्द पण दिला होता तो पुर्ण होत नसल्यामुळें मी भाजपातुन बाहेर पडत आसुण दोन दिवसात पुढील भुमीका जाहीर करणार आसल्याचे सांगीतले…
दिवस न बदलताच भाजपातुन बाहेर पडण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आसल्याचे चित्र महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात देखील सुरू आसुण आता पर्यंत बीड जिल्ह्य़ातील प्रमुख डझनभर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्टी देत तुतारी तोंडात घेतल्याची दिसुण येत आहे