बीड जिल्ह्यातील धारुर मध्ये पहिली बौद्ध धम्म परिषद

१८ फेब्रुवारी रोजी जवळा फकीर येथे पहिली बौद्ध धम्म परिषद – भदंत पय्यातीस महाथेरो

बीड प्रतिनिधी केशव डी.मुंडे –-वेगवान मराठी 
धारूर तालुक्यातील जवळा फकीर येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भदंत पय्यातीस महाथेरो यांनी केले आहे.

या धम्म परिषदेचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी मृगदायवन महाविहार, जवळा फकीर येथे डॉ. भदंत प्राचार्य खेमधम्मो महाथेरो, मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.

तर धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, पूर्णा हे असणार आहेत. सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहण होणार आहे.

त्यानंतर महाबोधी वंदना होईल. तर सकाळी ११ ते १२:३० यादरम्यान भिक्खू संघास भोजनदान आणि त्यानंतर दुपारी १ वाजता धम्मदेसनेस सुरुवात होणार आहे.

धम्म परिषदेस डॉ. प्रा. सत्यपाल महाथेरो, डॉ. भदंत इंदवंस महाथेरो, विपस्सनाचार्य भदन्त पय्यारत्न थेरो, भदन्त पय्याबोधी थेरो, भदन्त मुदितानंद थेरो, भदन्त ज्ञानरक्षित थेरो, भदन्त महाविरो थेरो, भदन्त पय्यानंद थेरो, भदन्त पय्याशील थेरो, भिक्खू धम्माल थेरो, भिक्खू रेवतबोधी, भिक्खू पय्यावर्धन, भिक्खू संघरत्न, भदन्त धम्मघोष यांची धम्मदेसना होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून आ. प्रकाश दादा सोळंके, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रा. प्रदीप रोडे, राजेंद्र कांबळे, प्रकाशजी कोकाटे, भाई कीर्तीकुमार बुरांडे, जवळा फकीरचे सरपंच त्र्यंबक साबळे, माजी सरपंच सुनीता मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या धम्म परिषदेस धम्म बांधवांनी व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भदन्त पय्यातीस महाथेरो यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!