विनयभंग प्रकरणात 24 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल

विनयभंग प्रकरणात 24 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल, तलवाडा पोलीसांची कारवाई…
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डी मुंडे काल दिनांक 17/02/2025 रोजी एका पिडीत महीलेने तिचा दोन आरोपी १) हरिनारायण ऊर्फ नारायण पांडुरंग कोकाट वय-४० वर्ष रा-ठाकर आडगाव ता. गेवराई २) सुग्रीव मदन पांढरे वय-३८ वर्ष रा-ठाकर आडगाव ता. गेवराई जि. बीड यांनी संगनमताने विनयभंग केला आहे अशी फिर्याद दिली होती.
त्यावरुन दोन्ही आरोपीविरुद्ध तलवाडा पोलीस ठाणे गुर.नं. ९४/२०२५ भा.न्या.सं. कलम-७४,७५(१) (२) ३(५) प्रमाणे काल दिनांक-१७/०३/२०२५ रोजी १६.३५ वा. सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ यांनी तपासकामी विशेष पथकाची नेमणुक केली.
सदर गुन्हयातील आरोपीताविरुध्द तलवाडा पोलीसांनी वेळ न दवडता २४ तासाचे आत आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कायद्यानुसार कारवाई करुन घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविले.
सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील यांनी सदर गुन्हयाचा जलदगतीने तपास पूर्ण करुन गेवराई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.
यात तपास अधिकारी श्री. स्वप्नील यांना त्यांचे पथकातील स.फौ./735 विठठल, स.फौ/359 भगवान, पोह/606 नारायण, चालक पोना/992 सुग्रीव, महिला अमंलदार/2148 मिना यांनी परीश्रम घेवुन सदर कामगीरी केली आहे.
तपास अधिकारी यांनी वरीष्ठांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली मा. गेवराई न्यायालयात आरोपीविरुध्द आज दिनांक-१८/०३/२०२५ रोजी दुपारी 14.00 वा सुमारास आरोपपत्र दाखल केले आहे.
सदर कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत सर, अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज सर यांचे मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि/सोमनाथ तसेच त्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील, स.फौ./735 विठठल, स.फौ/359 भगवान, पोह/606 नारायण, चालक पोना/992 सुग्रीव, महिला अमंलदार/2148 मिना यांनी केली आहे.
बीड जिल्हयात महिला अत्याचाराचे गुन्हयामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात आरोपपत्र दाखल करण्याची ही पहीलीच वेळ असुन तलवाडा पोलीसांच्या तत्पर भुमिकेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित सर यांनी टीमचे कौतुक केले आहे. तलवाडा पोलीसांचे तत्परतेचे नागरिकांनी देखील टीमचे कौतुक केलेले आहे.