उदगीर येथील पत्रकार साहित्य संमेलनात बीड येथील पत्रकार पुरस्काराने सन्मानित होणार

उदगीरच्या पत्रकार साहित्य संमेलनात बीडचे पत्रकार रवी उबाळे पुरस्काराने होणार सन्मानित
केशव मुंडे वेगवान मराठी बीड / प्रतिनिधी दिनांक 16.10.24
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने  मराठी पत्रकार साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या 20 ऑक्टोबर रोजी केले  आहे..या साहित्य संमेलनात बीडचे युवा पत्रकार तथा दैनिक नवराष्ट्र चे ब्युरो चीफ रवी उबाळे यांचा सन्मान होणार आहे. या साहित्य संमेलनाला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख तसेच स्वागताध्यक्ष क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात बीडचे युवा पत्रकार रवी उबाळे यांच्यासह धुळ्याचे जेष्ठ पत्रकार गो .पी.लांडगे, परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा जान्हवी पाटील, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कैतके यांचा सत्कार होणार असून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल चारही पुरस्कार विजेत्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक शरद पाबळे राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख पुणे विभागाचे सचिव गणेश मोकाशी आदींनी अभिनंदन केले.
Back to top button
error: Content is protected !!