दिनांक 08/10/2024 केशव मुंडे वेगवान मराठी परळी
( स्थानिक गुन्हे शाखा-बीड कामगिरी)
परळी शहरात अवैध मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा बीड ची चार ठिकाणी छापेमारी चार गुन्हे दाखल करुन 68690/- रु चा मुद्देमाल जप्त केला
मा.श्री.अविनाश बारगळ साहेब, पोलीस अधीक्षक, बीड यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख, स्था.गु.शा.बीड यांना आदेश दिले आहे. त्याअनुषंगाने दिनांक 08/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांना परळी शहरातील अवैध जुगाराचे अड्डयांची गोपनिय बातमी काढुन चार वेगवेगळे पथके तयार करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करुन छापे टाकण्याचे आदेश दिले. स्था.गु.शा.पथकाने खालील प्रमाणे परळी शहर व संभाजीनगर परळी वै. हद्दीत चार ठिकाणी छापे टाकुण कारवाई केली आहे.
1) संभाजीनगर परळी वै. हद्दीत रेल्वे स्टेशन जवळ कल्याण मटका जुगारावर छापा टाकुन आरोपी नामे 1) गणेश विजयकुमार मोधने रा.शिवाजीनगर परळी वै. याचे ताब्यातुन 2000/- रु चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंद केला आहे.
2) संभाजीनगर परळी वै. हद्दीत लिमींद नगर येथे पत्र्याचे शेडमध्ये अवैध ऑनलाईन चक्रीचे जुगारावर छापा टाकुन आरोपी नामे सलीम युसफ शेख रा.वाल्मीक नगर परळी वै. याचे ताब्यातुन 30700/- रु चा जुगाराचा मुद्येमाल जप्त करुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
3) परळी शहरात बस स्टँडच्या समोर बेकायदेशिर मटका जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाली स्थागुशा पथकाने छापा टाकुन आरोपी नामे बिबन शब्बीर पठाण रा. भोई गल्ली परळी वै. याचे ताब्यातुन 14200/- रु चा कल्याण मटका जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे.परळी शहर येथे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
4) परळी शहरातील बस स्टँड जवळील देशी दुकानाचे बाजुला बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाली तेव्हा स्थागुशा पथकाने छापा टाकुन आरोपी नामे गणेश तुकाराम मुंडे रा.टोकवाडी ता.परळी वै. याचे ताब्यातुन जुगाराचा 21790/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे. परळी शहर येथे महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत् गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकंदरीत परळी शहरात अवैध धंद्याविरुध्द एकुण चार कारवाया केलेल्या असुन त्यामध्ये एकुण 68690/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारावाई ही मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक,बीड, पोलीस निरिक्षक श्री.उस्मान शेख, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विघ्ने, श्रेणी पोउपनि हनुमान खेडकर, पोह/महेश जोगदंड, दिपक खांडेकर, तुषार गायकवाड, राहुल शिंदे, मारुती कांबळे, बप्पासाहेब घोडके, बाळु सानप, चालक वडमारे यांनी केली आहे