नवनीत कावत बीडचे नवे पोलिस अधीक्षक,वेलकम टु बीड सिंघम

वेगवान मराठी बीड केशव मुंडे -दि- 21 /12/ 2024- प्रतिनिधी -बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एका खमक्या तरुण एसपी ची नितांत गरज होती,जिल्ह्यत दिवसा ढवळा पडणारे मुडदे,मस्तावलेले वाळु माफिया,निरढावलेले खंडणीखोर,भुमाफीयांचे जंगलराज,विमा घोटाळा ,पतसंस्थेचे महा घोटाळे,बोकाळलेले अवैध धंदे आणि जिल्ह्यातील बिघडलेले सामाजीक राजकीय संबंध यावर लगाम लाऊण गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेच्चुण काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्वपदावर आनण्यात नवे पोलिस अधीक्षक श्री नवनित कुवत यांना कितपत यश येते ते पाहावे लागेल…

कोण आहेत नवनीत कॉवत 

नवनीत कॉवत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.

दरम्यान अविनाश बारगळ यांची बीड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावरुण उचलबांगडी झाल्या नंतर समस्त जिल्हावासीयांच्या नजरा नविन पोलीस अधिक्षक कोण येणार याकडे लागल्या होत्या अखेर आज बीड जिल्ह्यस नवनित कुवत यांच्या रुपाने एक खमक्या पोलिस अधिक्षक जिल्ह्याला लाभला आहे

भा प.पो.से. अधिका 1/2 बदली/पदस्थापने बाबत.महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन आदेश क्र. एच.डी.-१००३२/१४७/२०२४/पोल-१.शिबिर कार्यालय, जुने हैदराबाद हाऊस, सिविल लाईन्स, नागपूर. पिन-४४०००१.दिनांक : २१.१२.२०२४.शासन आदेश.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से. अधिका-याची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदावरुन, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.-

अ.क्र.(৭) भा.पो.से. अधिका-याचे नाव -(श्री.नवनीत कॉवत विद्यमान पदस्थापना पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर बदलीने पदस्थापना पोलीस अधीक्षक, बीड

२. श्री. अविनाश बारगळ, भा.पो.से., यांची याद्वारे बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील परंतुकानुसार, सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२२१११२१०६४५२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.(संदीप गो. ढाकणे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,१) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, शिबिर कार्यालय, जुने हैदराबाद हाऊस, सिविल लाईन्स, नागपूर.२) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

Back to top button
error: Content is protected !!