वाळु,गांजा,गौमाता,शस्त्र मद्य इत्यादी अवैध तस्करीखोरांचा केला करेक्ट कार्यक्रम

वेगवान मराठी बीड प्रतिनिधी- K.D.MUNDE- दिनांक-01/01/2025 नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीड पोलीसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपींना अटक करुण जिल्ह्यातील गुन्हेगारांना एक प्रकारचा नविन वर्षाचा इशारा देण्यात आला आहे,एखाद्या सक्ष्म अधिकाऱ्यास फ्रिहैंड दिल्या नंतर तो काय करु शकतो याचे उदाहरण म्हणजे बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत साहेब.
गुन्हेगारी आसो,शासकीय कर्मचारी आसो की,राजकीय छप्परी कार्यकर्ते आसोत की तस्करीखोर,खंडणीखोर,वाळुमाफीया,राखमाफीया मग क्षेत्र कोणतेही आसो,”नो गाजावाजा नो बकवास” फक्त टप्यात आले की करेक्ट कार्यक्रम लावणाऱ्या पोलीस अधिक्षकांचे सध्या तरी जिल्हावाशियां कडुण कौतुक होताना दिसत आहे,…
© नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी केला खालील प्रकरणातील गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम ®.दिनांक 30/12/2024 रोजी दर्शवेळा अमावस्या व दिनांक 31/12/2024 रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला बीड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री. नवनित कोंवत (भा.पो.से.) यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून प्रभावी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या.वाळुची अवैद्य तस्करी करणाऱ्यांवर केली थेट कारवाई
त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मागील दोन दिवसांत अवैध दारु विक्री करणारे एकूण 52 इसमांवर छापेमारी करुन 6,22,530/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकूण 52 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करुन 8.89,400/- चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 6 ठिकाणी जुगारावर छापा टाकुन 34740/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गोवंशाची अवैध वाहतुकीची। कारवाई करुन 1,69,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्रीच्यावेळी अस्तीत्व लपवुन संशयीतरीत्या फिरतांना 2 इसम मिळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियम अंतर्गत एका स्कीपीओ गाडीतून अवैध चाकु कुकरी, लाकडी हिट बैट बाळगणा-या इसमाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन 10.01.200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जिल्हाभरात दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 79 इसमांवर मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत 79 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण 646 वाहनांवर दंडात्मक कारवाया करुन एकूण 4,23,650/- रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्याने मोटार बाहन दुरुस्ती कायदा 2019 चे कलम 199(अ) अन्वये 2 पालकांवर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत NDPS कायद्यांतर्गत एका ठिकाणी छापा टाकुन 86 किलो गांजा जप्त करुन 17,77,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनित कीवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाहतुक शाखा, सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी केली आहे.