परळी तालुकाध्यक्षा कडुण राजेसाहेब देशमुख यांना घरचा आहेर

मा_राजेसाहेब_भाऊ_देशमुख,
हात_जोडून_साष्टांग_नमस्कार..
वेगवान मराठी परळी-केशव मुंडे -दिनांक 12 फेब्रुवारी 2025 परळी प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभा निवडणुक लढलेले शरदचंद्र पवार गटाचे पराभुत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना जाहिर पत्राद्वारे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत घरचा आहेर दिला आहे!  काय आहे नेमके प्रकरण ते पहा 👇

पत्रास कारण की मी शिवश्री देवराव लुगडे महाराज मागच्या काही वर्षात परळीतील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारा एक परळीच्या भागांमध्ये लोकशाही मार्गाने नांदणारा व दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात कायम ठामपणे रस्त्यावर उतरून लढणारा एक परळीकर नागरिक असून माझं मत अनुभव या पत्राद्वारे आपणास पाठवत आहे.

आपण मागच्या 2024 विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातुन निवडणूक लढवलीत. या निवडणुकीमध्ये अनेक संकटाचा सामना करत सर्व जाती धर्मातील 55 हजार लोकांनी आपल्याला मतदान केले.

समोरच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणात साम दाम दंड भेद याचा सर्रास वापर झाला तरीही परळी मतदारसंघातील बहाद्दर लोकांनी आपल्याकडून कसल्याही गोष्टीची अपेक्षा न करता मतदान केले आहे. पण निवडणुकीला तीन महिने झाले तरी आपण परळी मतदारसंघात आला नाहीत.

या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या नाहीत. आपण फक्त टीव्हीवर मुलाखत देताना आम्हाला दिसता. मागच्या निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना बोलत होतात कि परळी शहरांमध्ये घर घेणार आहे, परळी शहरांमध्ये ऑफिस उघडणार आहे. अशी अनेक आश्वासन आपण दिले पण असो आपल्या काही अडचणी असतील त्यामुळे हे झाले नसेल हरकत नाही.

“एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही” या युक्ती प्रमाणे निवडणुकीतील एका पराभवाने राजकारण संपत नाही. पण ज्यांनी तुमच्यावर विश्वास केला त्या जनतेला वाऱ्यावर सोडायचं नसतं हे पण तेवढंच खरं आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण 2029 टारगेट ठेवून सातत्याने या परळीच्या भागांमध्ये लोकांच्या अडीअडचणी सुखा दुःखात सामील झालात तर नक्कीच आपला विजय कोणीही रोखू शकणार नाही.

परळीतील बहाद्दर मतदार मायबाप जनता खूप हुशार आहे अनेकांना कर्तुत्व नसतानाही खूप मोठे केलेलं आहे आणि भल्याभल्यांना पाणी पाजण्याचं काम सुद्धा या मातीतील जनतेने केल आहे. त्यामुळे आपल्याला पुढील वाटचाल करताना याचाही विचार करावा लागेल यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती आणि अपेक्षा पण आहे.

अन्यथा हे करायचे नसेल तर परळी मतदारसंघातील जनतेला त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्या. कारण मी व्यक्तीशा मागच्या काही वर्षांमध्ये परळी मध्ये जो या सत्ताधाऱ्यांचा नंगाना चालू आहे याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला, विघ्नसंतोषीच्या विरोधामध्ये अनेक अत्याचाराला वाचा फोडली आहे बोगस कामाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळे आंदोलनं केली आहेत.

हे करत असताना माझ्यावर खोटा अट्रॅसिटी गुन्हे दाखल झाला आहे. नको नको त्या धमक्या दाबदडप अनेक गोष्टी घडत असतानाही आम्ही कुठेही विचारधारेपासून तडजोड न करता पळालो नाहीत. किंवा आजही निधड्या छातीने या परळीच्याच भागामध्ये वास्तव्य करतो आणि भविष्यातही मरेपर्यंत या परळीच्या भागांमध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत राहू निधड्या छातीने काम करत राहू. हे करत असताना आम्ही कधीही चुकीचं काम करणार नाहीत विचारधारेची तडजोड करणार नाहीत हे ठामपणे या ठिकाणी सांगतो.

माझ्या बोलण्याचा मतीतअर्थ समजून घ्या व यापुढे जर आपल्याला परळी मतदारसंघांमध्ये काम करायचे असेल तर सातत्य ठेवा.

लोकांमध्ये या परळी मध्ये घर करा ऑफिस करा हे करत असताना आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत हाही विश्वास परळीतल्या बहाद्दर जनतेच्या वतीने देतो.

फक्त विनंती आहे की टीव्ही आणि बातमीच्या द्वारे आपण या विरोधात फक्त बोलण्याचे काम करत असाल तर ते करू नये एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो.. धन्यवाद 🙏

आपलाच :–तालुका अध्यक्ष परळी वैजनाथ आणि एक परळीकर शिवश्री देवराव लुगडे महाराज मो नं 9767335167  / 9764749337

Back to top button
error: Content is protected !!