परळी मतदारसंघासह 5 मतदारसंघातील EVM आणि VVPAT चे randomization

केशव मुंडे बीड दि. 20 (वेगवान मराठी) :  बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघातील मतदान यंत्रांचे प्रथम स्तरीय संगणकीकृत  (1ST Randomization) आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक,उपजिल्हानिवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रक्रिया अंतर्गत प्रथमस्तरीय सरमिसळमध्ये 2897 बॅलेट युनिट आणि 2897 कंट्रोल युनिट आणि 3138 व्हीव्हीपॅटचे वाटप विधानसभा मतदार संघांना केले. हे मतदान यंत्र विधानसभा निहाय वाटप करणेकरीता गोदाम उघडण्याची परवानगी व ईव्हीएममशीन्स विधानसभा निहाय स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे आज 228-गेवराई, 229-माजलगाव, 230- बीड, 231-आष्टी, 232-केज, 233-परळी विधानसभा मतदार विभागासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सचे प्रथम सरमिसळ (1 Randomization) करण्यात आली आलेली आहे. आता या सरमिसळ (1 Randomization) प्रक्रियेनंतर या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि विहित कार्यपद्धतीप्रमाणे योग्य त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!