बीडच्या निवृत कोर्ट अधिक्षकांचे प्रयागराज कडे जाते वेळी निधन

न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक उमेश राठोड यांचे कुंभमेळ्याच्या स्नानासाठी प्रयागराज कडे जाते वेळी हार्ट अटैकच्या झटक्यात रस्त्यामध्येच निधन
वेगवान मराठी केशव मुंडे+बीड (प्रतिनिधी)-१२ फेब्रुवारी 2025 – बीड जिल्हा सत्र न्यायालयातून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले उमेश हरिलाल राठोड यांचे कुंभमेळा प्रयागराज येथे जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने न्यायालयीन वर्तुळात शोककळा पसरली आहे.
न्यायालयीन सेवेत मोलाची भूमिका
उमेश हरिलाल राठोड यांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात अनेक वर्षे सेवा बजावली होती. न्यायालयीन प्रशासनात कुशलतेने काम पाहत त्यांनी आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवला होता. सहकाऱ्यांमध्ये ते मनमिळावू व संयमी स्वभावासाठी परिचित होते.
कुंभमेळ्याच्या यात्रेतच प्रकृती बिघडली ते कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 13/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील अमरधाम मोंढा रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्त परिवार आहे.