नंदनंज येथे संत केदारी महाराज अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

केशव मुंडे वेगवान मराठी परळी वैजनाथ (प्रतिनिधी- 11/12/24) येथून जवळच असलेल्या मौजे नंदनज येथे उद्या पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तने होणार असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदनंजचे सरपंच सुनील गुट्टे यांनी केले आहे.

दिनांक 11 ते 18 डिसेंबर या दरम्यान नंदनज येथील श्री संत केदारी महाराज संस्थान येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णूसहस्र नाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ श्री तुकाराम गाथा भजन, २ ते ५ भावार्थ रामायण, सायं. ६ ते धुपारती, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन, १२ ते २ हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत. व्यासपीठ प्रमुख म्हणून ह. भ. प. तुकाराम महाराज गुट्टे लोकरवाडीकर यांची उपस्थिती राहणार आहे. नामवंतांची होणार कीर्तने

या सप्ताहात उद्या बुधवारपासून ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरूजी, ह. भ. प. गणेशानंद महाराज शास्त्री, ह. भ. प. भागवताचार्य तुकाराम महाराज शास्त्री, ह. भ. प. आप्पासाहेब महाराज चौरे, ह. भ. प. महादेव महाराज राऊत, ह. भ. प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तन होणार आहेत तर दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत ह. भ. प. बालासाहेब महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांना परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदनंज गावचे सरपंच सुनील गुट्टे व नंदनज ग्रामस्थांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!