कपिलधार येथे कोजागिरी पौर्णिमा जल्लोषात साजरी

बीड । प्रतिनिधी केशव मुंडे वेगवान मराठी
श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कपिलधार देवस्थानच्या वतीने शि.भ.प. उमाकांत आप्पा मिटकरी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. या कोजागिरी पौर्णिमेला 111 लिटर दुधाच्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच यावेळी कीर्तनकार महाराजांनी श्रीसंत शिरोमणी मन्मथ स्वामीनी जो मार्ग दाखविला तो शुद्ध अंतकरणाने, निस्वार्थ केलल कर्म, व भक्तीसेवा ही मानव समाजाला उच्च स्थानी घेऊन जाते . संताने दाखविलेल्या भक्ती मार्गाने समाज प्रबोधन होते.असे महाराजानी आपल्या शिव कीर्तनात सांगितले.
तसेच रात्री हाडोंग्री भजनी मंडळ, तमलूर भजनी मंडळ ,मासिक पौर्णिमा भजनी मंडळ बीड तसेच चिंचोली भजनी मंडळ, मन्मथ भजनी मंडळ कळब यांनी कार्यकार्यक्रमास उपस्थित लावली. तसेच यावेळी कार्यक्रमास उपस्थित पूजेचे यजमान नागेश आप्पा मिटकरी बीड, मन्मथ स्वामी देवस्थान पुजारी विश्वनाथ स्वामी आप्पा (कपिलधार), वैजनाथ दगडू शिंदे महाराज दत्त संस्थान (कपिलधारवाडी), शंकर स्वामी जायफळकर, मन्मथ स्वामी देवस्थानचे विश्वस्त अश्रुबा रसाळ, शिवशंकर आप्पा भुरे, झांबरे आबा, अशोक शहागडकर, श्रीकांत मिटकरी, सुशील रसाळ, सोमनाथ रसाळ, डॉ. त्रिंबक स्वामी, नाना शिंगणापूर, अविनाश तोडकर, डॉ. वलांडे, हलकुडे आप्पा, दिनेश राजमाने आदी उपस्थित होते.