ग्रुप ऐडमिन आणि सोशल मिडीया युजर्स जाणार बाराच्या भावात

केशव मुंडे वेगवान मराठी बीड-दि.21.10.24

{बीड प्रतिनिधी } ज्या अर्थी आपण आपले गावात शहरात सोशल मिडीया माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहात. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर दि. 15/10/2024 रोजी पासून आदर्श आचारसंहिता लागू असून निवडणुक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रीया होणार असून दरम्यान मा.जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशान्वये बीड जिल्हास्थळ सीमेच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम. 163 अन्वये 37 (1) (3) चे प्रतिबंधक आदेश तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी करून दिनांक. 25/11/2024 रोजी पावेतो निबंध घालण्यात आले आहे.

त्याअर्थी मी मारोती खेडकर पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड मला प्राप्त अधिकारान्वये आपणास नोटीस देतो की, मतदान प्रक्रिया व प्रचारादरम्यान आपणास खालीलपैकी कोणतेही गैरकृत्य करण्यापासून परावृतत होणेकरीता आदेश निर्गमित करीत आहे.

1) कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तीक, कोंटुबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल

असेआक्षेपार्ह टिकाटिपण्णी करणे, मजकुर, फोटो, व्हिडीओ (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे अथवा

आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे. 2) मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीत द्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर फोटो, व्हिडीओ (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे.

3) निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप निर्माण करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकुर फोटो, व्हिडीओ. (एडिट/माफिंग) करून प्रसारीत करणे अथवा कृत्य करणे.

4) कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अॅडमीन जबाबदार असणार आहे.

वरील सुचनांचे पालन करणे हे आपल्याला बंधनकारक राहिल. आपलेकडून आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येऊन आपले विरूद्ध कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपणाविरूद्ध पुरावा म्हणून मा. कोर्टासमोर सादर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. सदरची नोटीस हि आज दिनांक. 21/10/2024 रोजी माझे सही शिक्क्यानिशी प्रसिद्धीसाठी दिली आहे

Back to top button
error: Content is protected !!