परळी येथील पाचांगे सरांना सुर्योदय कला अकादमीचा आदर्श शिक्षक जिवन गौरव पुरस्कार

सुर्योदय शिक्षण कला अकादमी परळी वै.तर्फे दिला जाणाऱ्या निवृत आदर्श शिक्षक जिवन गौरव पुरस्काराच्या द्वितिय वर्षाचे मानकरी ठरले बि.डी.पांचांगे सर …
वेगवान मराठी परळी वैजनाथ दिनांक-5 मार्च 2025 रोजी परळी वैजनाथ येथील संसस्का विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री बाबासाहेब ज्ञानोबा पांचांगे यांना कै.सोपान सर सरवदे (शिक्षक) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा निवृत आदर्श शिक्षक जिवन गौरव पुरस्कार यांना श्रि.महादेव रोडे व सरवदे सरांचे पुत्र अरुण सरवदे यांच्या हास्ते प्रदान करण्यात आला
दरम्यान यापुर्वी देखील श्री पांचांगे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने संस्कार शाळा परळी वैजनाथ यांच्या कडुण सन्मानित करण्यात आले होते, याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पांगरी गावकऱ्यांच्या वतिने समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे
याचीच दखल घेऊण सूर्योदय शिक्षण कला अकादमी परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या वतीने सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार संयोजक अरुण सोपानराव सरवदे ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी परळी वैजनाथ यांनी पाचांगे सरांची निवड केली आहे
यावेळी सरवदे कुटुंबीयांसह श्रीमान महादेव रोडे ,सेवकराम जाधव सर ,प्रा. मिलिंद क्षिरसागर ,पत्रकार केशवराव मुंडे , ईंजी.तुकाराम नागरगोजे सर,
महादेव फड .गोवींदराव गुटे (ग्रामपंचायत सदस्य दैठणा ) सोडगीर महाराज,चंद्रकांत मुंडे, नंबरदार भाभी,पिंपळे मैडम गुनाबाई मुंडे ,नाझीरभाई,आणि पांचांगे सर आणि सरवदे सर यांचा मित्रपरिवार आणि आप्तेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते