महाराष्ट्र

कांद्याने चांगली जीरवली, भाव आले एवढे खाली

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव 

नाशिक ,ता. 20 – नाशिक जिल्ह्याचा नगदी पीक म्हणून कांदा पिकाची ओळख असले तरी कांदा मात्र आता शेतकऱ्यांना रडवू लागलेला आहे कांदा पिकाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झालेला आहे पाच हजारावर विकणारा कांदा अवघा पंधराशे ते दोन हजार रुपये दराने विकू लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.

कांदा पिकापेक्षा शेतकऱ्यांना मका पिक सगळ्यात महत्त्वाचं वाटू लागलेला आहे. मका पिकामधून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळालेले आहेत. कारण मका पिकातून शेतकरी डबल फायदा करत आहेत.

शेतकरी सुरुवातीला फक्त 75  दिवसाची मका झाल्यानंतर त्याची कापणी मुरघासाठी करत असतात.  त्यातून शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांचे मुरघास (सायलेज ) उत्पन्न मिळतात.  70 दिवसात मकाची मुरघासासाठी कापनी केल्यानंतर लगेच शेतकरी दुस-यांदा मका टाकून ही मका पुन्हा आडीच महिन्यात मुरघासासाठी तयार होते.

दुसऱ्यांदा मका कापणी केल्यानंतर परत पन्नास हजाराचे उत्पन्न मिळतं. म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात एक लाख रुपयाचा उत्पन्न  फक्त जनावरांच्या चाऱ्याच्या मुरघासांमधून मिळत असल्यामुळे आता शेतकरी मकाचे धान्य व मुरघास असा दुहेरी फायदा घेत असून शेतकरी आता हुशार झाले आहे.

कांद्याला मात्र 4 महिन्याचा वेळ जातो तो पर्यंत मकाचे पाच महिन्यात दोन वेळा मुरघास म्हणून मक्याचे उत्पादन घेतले जाते. कांद्याचे भाव पाच हजारावर होते मात्र अवक वाढताच ते 1500 रुपयांवर आले. मात्र मकाचा भाव बाजारामध्ये स्थिर आहे. त्यामुळे खरीप हंगामात मक्याचे क्षेत्र वाढणार असून पुढील वर्षी सोयाबीन ऐवजी मक्याचे क्षेत्र नाशिक सह महाराष्ट्रात वाढणार असे कृषी विभागाने नोंदविले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
शुक्रवार दि.20/12/2024 चे बाजारभाव
—————————————
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 कांदा लाल=801-2461-1730
👉 लाल (गोल्टा/गोल्टी)=200-1491-850

ओम श्री गुरुदेवदत्त खाजगी मार्केट हिवरगाव 🧅
शुक्रवार : दि : 20/12/24
★ एकूण कांदा आवक : 255
जीप : 196 ट्रॅक्टर : 59
★लाल कांदा भाव
1300 ते 1500- 23 नग
1501 ते 1700- 102 नग
1701 ते 1900- 43 नग
1901 ते 2100- 21 नग
2101 ते 2300- 12 नग

दि. २०/१२/२०२४ विंचूर उप-बाजार समितीचे पहिल्या सत्रात

झालेले एकूण कांदा लिलाव – ५०० नग

लाल कांदा:- ५०० नग
—————————
लाल कांदा बाजारभाव
क.क.- ८००
जा.जा.-२१५१
स. स.- १७००

सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट
पोखरी ता. नांदगाव जि. नाशिक
=======================
दि. २०/१२/२०२४ शुक्रवार बाजारभाव
सकाळ सत्र
================
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
लाल कांदा बाजारभाव
कमीत कमी – ४००
जास्तीत जास्त – १६५०
सर्वसाधारण – १४००

म्हसोबा माथा बोकडदरे ((विंचूर))
वार.शुक्रवार दिनांक-:२०/१२/२०२४
कांदा आवक व बाजार भाव
पहिल्या सत्रात झालेले कांदा खरेदी आवक
लाल-: ६१४
सकाळ-: ६१४ नग
दुपार-: नग

एकुण-: नग
—————————–
कांदा लाल आवक बाजार भाव

क.क-:१०००
जा.जा-:२६७०
स.स-:१७५०

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
दिनांक २०/१२/२०२४ शुक्रवार.
एकूण कांदा लिलाव १०३४ नग
लाल कांदा – १०३४ नग
ऊन्हाळ कांदा – ०० नग
कांदा आवक अंदाजे १२५०० क्विंटल

👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
लाल कांदा – ८०० – २७११ – २०००

कृषि उत्पन्न बाजार समिती,पिंपळगाव बसवंत उपबाजार आवार –

सायखेडा शुक्रवार दिनांक :-20/12/2024
सकाळ दुपार सत्र
लाल कांदा आवक
जीप–>245 ट्रॅक्टर–>39
लाल कांदा बाजार भाव लाल कांदा–>1400-2067-1900
गोल्टी–>500-1325-800
खाद–>200-500-300

कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक
दि.20/12/2024 शुक्रवार
🌰🌰🌰🌰🌰
लाल कांदा
1500-2250=189
1000-1500=155
500-1000=102
200-500=358
एकूण वाहन=804

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!