
वेगवान मराठी बीड -केशव मुंडे दि-२२/१२/२४ महाराष्ट्रासह देशभराचे लक्ष असलेल्या बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणाचे वकिल पत्र विशेष वकिल (अभियोजक) म्हणुण नियुक्ती करण्यात आली आहे,सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणास बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघातील भाजपाचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्वताची राजकीय कारकिर्द पणाला लाऊण गुन्हेगारांच्या विरोधात अक्रमक होत मस्साजोग प्रकरण लाऊण धरुण शासणाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले होते..
या हत्येचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यालाच देण्यात यावा अशी देखील मागणी आ.सुरेश धस यांनी केली होती. तसेच या हत्या प्रकरणी विशेष वकीलाची नेमणूक करण्यात यावी अशी देखील मागणी होती, त्यामुळे दिनांक २१ डिसेंबर रोजी ‘विशेष लोक अभीयोजक” म्हणून बाळासाहेब दत्तात्रय कोल्हे यांची विशेष वकील म्हणून नेमणूक करण्यात आली.
तसेच विशेष वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या बाळासाहेब कोल्ह यांची फी गृह विभाग करणार आहे. बाळासाहेब कोल्हे याना फौजदारी प्रकरणातील अनुभव,माहिती व अभ्यास असल्याने त्यांनी बऱ्याच आरोपींना शिक्षेस पात्र होईल असे प्रकरणे निकाली लावले त्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी म्हणून नियुक्त करण्यात आले.असा आदेश अनुभाग अधिकारी,विधी एव न्यायपालिका विभाग प्रमुख वैशाली बोरुडे यांनी काढला आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.