क्राईमबीड

केज पोलीसांचा नवा प्रताप ! चोर सोडुण संन्याशाला ताप

Another act of inaction by the cage police exposed

केज पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा झाला उघड ! असाह्य विधवा महिलेला न्याय देण्याऐवजी !

संघटीत होऊण अत्याचार करणाऱ्या गुंडाड प्रवृतीच्या लोकांना हाफ्तेखोर केज पोलीस बळ देत होते !

ढाकणवाडीत महिलेच्या घरावर दगडफेक करत केली मारहाण केज पोलिसांकडून कारवाई शून्य !

वेगवान मराठी केशव मुंडे –बीड प्रतिनिधी – केज 14 फेब्रुवारी 2025 – केज तालुक्यातील ढाकणवाडी, तालुका केज, जिल्हा बीड येथील विधवा महिला लता तुकाराम ढाकणे यांच्या घरावर दगडफेक करून मारहाण करण्यात आली. दगडफेक करणारे गावातील शेजारचे लोक होते.

सदरील माहिती पोलिसांना फोनवर दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणा अपेक्षित होतं परंतु पण ते केज पोलीस कधीच वेळेवर येत नाहीत. व कारवाई करत नाही.

त्यामुळे थेट त्या विधवा महिलेने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनत कॉवत यांच्याकडे धाव घेतली.

झालेला अन्याय दूर करण्याची अपेक्षा व्यक्त ज्यांनी घरावर दगडफेक केली मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील केली आहे.

केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे एक विधवा महिला लता तुकाराम ढाकणे ह्या रहिवासी आहेत. त्यांची ढाकणवाडी येथे थोडी शेती आहे. शेतीवर भागत नाही,

त्यांचा मुलगा कृष्णा तुकाराम ढाकणे या मारहाणी व दगडफेकी मुळे भीतीपोटी अनेक दिवसापासून गाव सोडले आहे. मुलगा बाहेरगावी कामाला असतो.

शेजारील भावकीतील लोक त्यामध्ये नारायण संपत ढाकणे, संपत त्रंबक ढाकणे, गोकुळ काशिनाथ ढाकणे, विभीषण काशिनाथ ढाकणे, गोकुळ मनोहर हांगे, उत्तरेश्वर भीमराव हांगे, अभिमान रमेश भांगे, आसराबाई रमेश भांगे, निर्गुणा अभिमान भांगे, शितल उत्तरेश्वर हांगे, सोनाली संपत ढाकणे, चंद्रकला सुभाष ढाकणे, कुसुम भीषण ढाकणे, दिपाली गोकुळ ढाकणे, भागाबाई काशिनाथ ढाकणे, हे सर्वजण जाणीवपूर्वक या विधवा महिला शेतकरी यांना त्रास देत आहेत.

शेजारचे लोके भावकितीला असल्याने एकट्या लताबाई तुकाराम ढाकणे यांना त्रास देत आहेत, शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान, झाडाचे नुकसान करणे, पाईपलाईट फोडणे असा मानसिक त्रास देणे सातत्याने दर दिवस सुरू आहे.

शेतात केलेल्या पाईपलाईन तोडफोड व पिकाचे नुकसान भरपाई देखील देण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. केज पोलीस स्टेशन येथे अनेकवेळा तक्रार देऊन ही कारवाई केली गेली नाही.

10 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन च्या दरम्यान त्या घरीच होत्या त्यांच्या भावकीतील नारायण संपत ढाकणे याने घरावर तुफान दगडफेक केली. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी घराचा दरवाजा बंद केला व आत मधून पोलिसांना फोन केला.

केज पोलीस नी कसल्याच प्रकारचे उत्तर दिले नाही. या प्रकरणी घटणास्थळी भेटही दिली नाही कारवाई करणे तर दूरच म्हणून थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन झालेल्या अन्याय अत्याचार व दगडफेकीची हकीकत लता ढाकणे यांनी  सविस्तरपणे पोलीस अधीक्षकांना सांगितली.

आणि ती एस पी यांनी ऐकूनही घेतली.त्यांनी बीड च्या एसपी यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

अन्यथा जर न्याय न मिळाला तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे लता फड यांनी सांगितले आहे…

याप्रकरणी सदरील पिडीत लता ढाकणे यांना केज पोलीसांनी योग्य तो न्याय देण्याची अपेक्षा वेगवान मराठी करत आहे , परंतु लोकप्रतिनिधी म्हणुन बजरंग सोनवणे आणि नमिता मुंदडा यांचे देखील सामन्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष्य द्यायचे कर्तव्य आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!