3 महिण्याच्या बाळाला ऊसाच्या फडात टाकुण मातोश्री ने ठोकली धुम

वेगवान मराठी बीड केशव मुंडे 23 डिसेंबर जिवंत बाळ टाकून मातेचे पलायन; केज – तालुक्यातील होळ ते आडस या रस्त्याच्या कडेला सोमवारी सकाळी एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत बाळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. होळ – आडस रस्त्यावरून सोमवारी (दि.२३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला शेतातील उसाच्या पाचटात काळ्या व लाल चौकडी रंगाची रग पांघरून घातलेले तीन महिने वयाचे पुरुष जातीचे जिवंत बाळ आढळून आले. हे बाळ त्या ठिकाणी कोणी ठेवले याचा तपास पोलीस करीत आहेत.
◆◆वेगवान मराठी अपडेट बीड जिल्हा जाहिरातींसाठी संपर्क KESHAV MUNDE-8888 387 622 ◆◆