महसुल संबंधी कामांसाठी परळी सह जिल्हाभर महा राजस्व समाधान शिबीराचे आयोजन
Organization of 'Maharajswa Samadhan Shibirs' across all Assembly constituencies in Beed district.

बीड जिल्ह्यात विधानसभा निहाय छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन
बीड, दि. 24 (वेगवान मराठी केशव डी मुंडे परळी वै.) :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी महसूल प्रशासनाशी संबंधित विविध कामांसाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय माजलगाव, गेवराई, आष्टी, केज, परळी वैजनाथ आणि बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये माजलगाव विधानसभेत दि.26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता माऊली लॉन्स गढी रोड माजलगाव येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात दि.26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता बेद्रे लॉन्स, कोल्हेर रोड, गेवराई येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शुभम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात दि.27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोरेश्वर मंगल कार्यालय, नगर रोड आष्टी येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वशिमा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केज विधानसभा मतदारसंघात दि.28 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आर्यवीर मंगल कार्यालय, केज येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दीपक बजाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात दि.30 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर, परळी येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात दि.1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता अंबिका लॉन्स, पांगरी रोड बीड येथे घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार उपविभाग व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुलभरितीने पार पाडावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांनी दिल्या आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








