क्राईमबीड

तुमची बाईक चोरीला गेली असेल तर हि बातमी खास तुमच्यासाठी

( आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरवंद 29 मोटारसायकल जप्त 15 गुन्हे उघड)

वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 15 जुलै 26 बीड जिल्हयात होणाऱ्या दुचाकी चोरींच्या गुन्हयांचा उलघडा करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी विशेष पोउपनि विघ्ने यांचे पथक तयार केले होते. स्था.गु.शा चे पथक दि.१४/०७/२०२६ रोजी मोटारसायकल चोरा करणाऱ्या आरोपी चा शोध घेणे कामी गेवराई उपविभागात सिरसदेवी गावात पेट्रोलिंग करत होते.

गस्त घालत असताना पथकास एक विना क्रमांकाची मोटारसायकल दिसुन आली. सदर मोटारसायकल चोरीची संशय आल्याने पथकाने ईसमनामे गणेश सुदाम बहीर रा. पांढरवाडी यास थांबवले आणि विचारपुस केली.

सदर मोटारसायकल चोरीची असल्याची सांगुन ती त्याचा मित्र नामे वैभव बाबासाहेब खेडकर रा. माही जळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर याने चोरी केलेली असुन त्याने ईतर १४ चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी दिलेल्या असुन प्रत्येक मोटारसायकल विक्री मागे पाच हजार रुपये देणार असल्याचे सांगितले.

यावरुन पथकाने गणेश बहीर यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन वेगवेगळया कंपनीच्या एकुण १४ मोटारसायकल जप्त केल्या. पोउपनि विघ्ने यांचे पथक आरोपी नामे वैभव खेडकर याचा शोध घेणेकामी माहीजळगाव कडे रवाना झाले.

माही जळगाव येथे जावुन वैभव खेडकर यास ताब्यात घेवुन विचारपुस करताच त्याने बीड, अहिल्यानगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगली व सोलापुर ग्रामीण येथुन वेगवेगळया कंपनीच्या एकुण २९ मोटारसायकल चोरी केल्या होत्या त्यापैकी १४ मोटारसायकल मी गणेश बहीर यास विक्री करण्यासाठी दिल्या होत्या.

त्याचे कडे चोरीच्या १५ मोटारासायकल असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातुन १५ मोटारसायकल पथकाने जप्त केल्या.

दोन्ही आरोपीतांकडुन एकुण २९ मोटारसायकल जप्त करुन एकुण १४,९०,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला आहे.

यातील आरोपी नामे वैभव बाबासाहेब खेडकर हा सराईत गुन्हेगार असुन सन २०२२-२०२३ मध्ये जामखेड येथे मोटारसायकल चोरीच्या ३० गुन्हयात आरोपी आहे.

जप्त केलेल्या २९ मोटारसायकल पैकी उघड झालेले गुन्हे खालीलप्रमाणे…

अक्र पो.स्ट नाव गुरने वहान क्रमांक चेचीस क्रमांक इंजन क्रमांक वाहनाचा किमत प्रकार 👇 गाडी क्रमांक आणि तक्रारदाराचा पोलीस स्टेशन एरीया 👇

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, मा. अप्पर पोलीस समीर शेख, मा. पोलीस उपअधिक्षक श्री व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विष्ने, पोह बप्पासाहेब घोडके, पोह/महेश जोगदंड, पोह जफर पठाण, पोह/दिलीप गित्ते, भागवत शेलार, पोहवा दिपक खांडेकर, पोशि विकी सुरवसे, पोहवा युनुस बागवान, चापोह गणेश मराडे यांनी केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!