
– जमिनीचे वाद आणि कौटुंबिक मतभेद गंभीर गुन्ह्यांत रूपांतरित होण्यापूर्वी बीड पोलिसांशी संपर्क साधा
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी वै बीड –दि. 23/07/2026 जमिनीच्या वादासाठी “पोलीस आपल्या बांधावर”, कौटुंबिक मतभेदांसाठी “भरोसा सेल” आणि तक्रार-अडचणींसाठी “सुगम संपर्क अभियान”
बीड जिल्हा पोलीस दलाने मागील काही कालावधीत घडलेल्या दुखापत, गंभीर दुखापत, मारहाण व खुनाचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांचे Root Cause Analysis (मूळ कारण विश्लेषण) केले असता, सुमारे २६ टक्के गुन्ह्यांचे मूळ कारण जमीन व शेतीविषयक वाद असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये जमीन, शेत, बांध, पाण्याचे हक्क, शेतरस्ते, कालवे, पाइपलाईन तसेच जनावरे शेतात जाणे यांसारख्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांचा समावेश आहे. विशेषतः, विश्लेषण करण्यात आलेल्या कालावधीतील खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेदेखील अशाच स्वरूपाच्या वादातून उद्भवल्याचे दिसून आले आहे.
तसेच, या विश्लेषणात सुमारे १६ टक्के गुन्हे कौटुंबिक व वैवाहिक मतभेदांमधून
(Domestic/Marital Friction) घडल्याचे आढळून आले आहे. पती-पत्नीतील मतभेद, कुटुंबातील तणाव, सासू-सून अथवा इतर कुटुंबीयांमधील वाद वेळेत संवादातून न सोडवल्यास काही प्रसंगी त्याचे गंभीर गुन्ह्यांत रूपांतर होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर संभाव्य वादांचे गंभीर गुन्ह्यांत रूपांतर होण्यापूर्वीच नागरिकांना पोलीस प्रशासनाची मदत उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाकडून “पोलीस आपल्या बांधावर”, “भरोसा सेल” आणि “सुगम संपर्क अभियान” या माध्यमातून नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जमिनीच्या वादासाठी “पोलीस आपल्या बांधावर”
“पोलीस आपल्या बांधावर” या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष शेतात, बांधावर तसेच गावपातळीवर जाऊन संबंधित पक्षांशी संवाद साधतात. वादाचे स्वरूप समजून घेऊन संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली जाते
तसेच आवश्यकतेनुसार महसूल प्रशासन व इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाद शांततेने आणि कायदेशीर मागनि सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
बीड जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी जमीन, बांध, पाणी, शेतरस्ता, कालवा, पाइपलाईन, जनावरांमुळे होणारे नुकसान किंवा इतर शेतीविषयक कारणावरून वाद अथवा तणाव निर्माण झाल्यास कायदा हातात घेऊ नये. वाद गंभीर होण्याची वाट न पाहता आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून “पोलीस आपल्या बांधावर” उपक्रमाचा लाभ घ्यावा.
कौटुंबिक व वैवाहिक मतभेदांसाठी “बीड भरोसा सेल”
पती-पत्नीतील मतभेद, वैवाहिक तणाव तसेच कुटुंबातील विविध सदस्यांमधील वाद सोडविण्यासाठी “बीड भरोसा सेल” मार्फत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे. अनेक कौटुंबिक वाद योग्य वेळी संवाद, समुपदेशन आणि मध्यस्थीच्या माध्यमातून सोडविता येऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक अथवा वैवाहिक मतभेदांमुळे तणाव निर्माण झाल्यास वाद वाढण्याची किंवा त्याचे हिंसक स्वरूपात रूपांतर होण्याची वाट न पाहता भरोसा सेलची मदत घ्यावी.
बीड भरोसा सेल संपर्क क्रमांक प्रभारी अधिकारी 9225092839
नागरिक या क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन व मदत घेऊ शकतात.
तक्रारी व अडचणी थेट पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत “सुगम संपर्क अभियान”
नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलामार्फत “सुगम संपर्क अभियान” राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांना त्यांच्या तक्रारी, अडचणी तसेच पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती किंवा समस्या थेट बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांनी कोणतीही समस्या किंवा वाद मनात ठेवून त्याचे गंभीर स्वरूप होण्याची वाट पाहू नये. योग्य वेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
बीड जिल्हा पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे संपर्क क्रमांक
अ.क्र. पद / कार्यालय / पोलीस ठाणे
संपर्क क्रमांक
1 पोलीस अधीक्षक, बीड
श्री. नवनीत काँवत
9225092800
2|| अपर पोलीस अधीक्षक, बीड
श्री. समीर शेख
9225092801
3 अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई
श्रीमती चेतना तिडके
9225092802
4 उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड
9225092803
5 उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी
9225092804
6 उपविभागीय पोलीस अधिकारी, गेवराई
9225092805
7 – सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव
9225092806
सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस
अधिकारी, केज
9225092808
10 पोलीस उप अधीक्षक (गृह), बीड
11 बीड शहर पोलीस ठाणे
9225092809
12 शिवाजीनगर पोलीस ठाणे
9225092810
13 पेठ बीड पोलीस ठाणे
9225092811
14 बीड ग्रामीण पोलीस ठाणे
9225092813
9225092812
15 पिंपळनेर पोलीस ठाणे
9225092814
16 गेवराई पोलीस ठाणे
9225092815
17 चकलांबा पोलीस ठाणे
9225092816
18 तलवडा पोलीस ठाणे
9225092817
19 आष्टी पोलीस ठाणे
9225092818
20 पाटोदा पोलीस ठाणे
9225092819
21 अंभोरा पोलीस ठाणे
9225092820
22 शिरूर पोलीस ठाणे
9225092821
23 अंबाजोगाई पोलीस ठाणे
9225092822
24 अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे
9225092823
25 अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे
9225092824
26 परळी शहर पोलीस ठाणे
9225092825
27 परळी ग्रामीण पोलीस ठाणे
9225092826
28 संभाजीनगर परळी पोलीस ठाणे
9225092827
9225092828
29 बर्दापूर पोलीस ठाणे
9225092829
30 माजलगाव शहर पोलीस ठाणे
9225092830
31 माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे
9225092831
32 दिंद्रुड पोलीस ठाणे
9225092832
33 वडवणी पोलीस ठाणे
9225092833
34 सिरसाळा पोलीस ठाणे
9225092834
35 केज पोलीस ठाणे
9225092835
36 धारूर पोलीस ठाणे
9225092836
37 नेकनूर पोलीस ठाणे
9225092837
38 युसुफवडगाव पोलीस ठाणे
बीड जिल्हा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन
“वाद वाढण्याची वाट पाहू नका… पोलीस तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत.”
जमीन व शेतीसंबंधित वाद असल्यास “पोलीस आपल्या बांधावर”, कौटुंबिक किवा वैवाहिक मतभेद असल्यास “बीड भरोसा सेल”. तर अन्य तक्रारी. अडचणी व पोलीस प्रशासनाशी थेट संपर्कासाठी “सुगम संपर्क अभियान” यांचा लाभ घ्यावा.
किरकोळ वाद रागाच्या भरात हिंसक स्वरूपात नेऊ नका. संवादातून प्रश्न सोडवा, कायदा हातात घेऊ नका. योग्य वेळी संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यास अनेक गंभीर गुन्हे टाळता येऊ शकतात.
सुरक्षित, शांततामय आणि गुन्हेमुक्त बीड घडविण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे. संवादातून वाद मिटवूया गंभीर गुन्हे टाळूया.” आसे आवाहन करण्यात आले आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








