महाराष्ट्र

अखेर बाळराजेंना जामीन मंजूर !! शिवप्रेमीं मध्ये उत्साह !!

Balraje finally granted bail; enthusiasm among Shiv-admirers and citizens.

!! स्मारक उभारणी प्रकरणात बालराजे आवारे पाटील यांना जामीन; न्यायालया कडुण बाळराजेंनां दिलासा !!

!!! छत्रपतींच्या भुमित महापुरुषांचे स्मारक ऊभे राहावे या निर्मळ भावनेतुन कार्य करणाऱ्यास जेलची हवा आणि तोंड उघडले की शब्दा शब्दास सामाजीक तेढ निर्मान करणा ऱ्या समोर पायघड्या !!!

!!! सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? जनतेला काय संदेश देऊ पाहतयं सरकार ? भेदभाव न करता सर्व जातीधर्माच्या महापुरूषांचे स्मारक उभे करणे हा बाळराजेंचा गुन्हा कसा ? !!!

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी वै.बीड दिनांक -24 जुलै 2026 अंजनगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या प्रकरणात आरोपी असलेले स्मारक योद्धा बालराजे आवारे पाटील यांना भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 307 सह दाखल गुन्ह्यात माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर त्यांच्या समर्थकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणामुळे महाराष्ट्रभर मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान, न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, तपासाची स्थिती आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. जामीन मंजूर होणे म्हणजे संबंधित व्यक्ती निर्दोष ठरल्याचा निर्णय नसून, या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयीन सुनावणीनंतरच लागणार आहे.

जामीन मंजूर झाल्यानंतर बालराजे आवारे पाटील यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे सर्व शिवप्रेमी, हितचिंतक, कायदेशीर मदत करणारे व नैतिक पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ”

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा लढा अधिक बळकट झाला असून भविष्यातही असेच प्रेम, विश्वास आणि साथ लाभत राहो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणाकडे राज्यभरातील शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

( अण्णासाहेब जाधव यांचे मोलाचे सहकार्य )

या संपूर्ण प्रकरणात मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब जाधव पाटील यांचे मार्गदर्शन, समन्वय आणि सातत्यपूर्ण सहकार्य मोलाचे ठरल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली.

तसेच न्यायालयीन लढ्यात अॅड. प्रसाद ढिकले यांनी केलेली कायदेशीर बाजूची प्रभावी मांडणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मोलाचे योगदानही विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जामीन मंजूर होणे म्हणजे संबंधित व्यक्ती निर्दोष ठरल्याचा अंतिम न्यायालयीन निर्णय नसून, प्रकरणाची सुनावणी पुढे न्यायालयात सुरू राहणार आहे

( प्रसाद ढिकले निस्वार्थी भावनेणे सहकार्य )

या प्रकरणात अॅड. प्रसाद ढिकले यांनी निस्वार्थी भावनेने न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत बालराजे आवारे पाटील यांची बाजू ठामपणे मांडली. त्यांच्या सातत्यपूर्ण कायदेशीर पाठपुराव्याला आणि मांडलेल्या युक्तिवादाला अखेर यश मिळाल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब जाधव पाटील यांनी केलेले मार्गदर्शन, समन्वय आणि सहकार्यही या लढ्यात मोलाचे ठरल्याचे सांगण्यात आले.

जामीन मंजूर झाल्यानंतर बालराजे आवारे पाटील यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे सर्व शिवप्रेमी, हितचिंतक, कायदेशीर मदत करणारे आणि नैतिक पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानले

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!