क्राईमबीड

सुरज जगदाळे यांच्या निलंबना मुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता

Is the action taken against Assistant Registrar Suraj Jagdale under a cloud of suspicion?

!! सहाय्यक निबंधक सुरज जगदाळें वर झालेली निलंबना ची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात !!

!! श्री जगदाळेंवर झालेल्या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे !!

!!! ठेविदार कृती समिति चे अध्यक्ष श्री सेवकराम जाधव यांच्या कडुण चिंता व्यक्त करण्यात आली आहे !!!

वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वै.बीड  दि -23 जुलै 2026 सहाय्यक निबंधक आधिकारी श्री सुरज जगदाळे यांनी माजलगाव विभागाचा कार्यभार सांभळल्या नंतर पतसंस्था आणि मल्टिस्टेट मध्ये अडकलेल्या ठेविदारांच्या हितास प्रथम प्राधान्य देत कर्जदार,सावकार,आणि पतसंस्थेच्या संचालकांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

कर्ज वसुली चा तगादा आणि तडजोडीस म्हणजे चिरीमिरी घेण्यास मिळत असलेला स्पष्ट नकार यामुळे संचालक आणि कर्जदारांचे धाबे दणानले होते,याच विषयावरुण श्री सुरज जगदाळे आणि कर्जदारांमध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते.

मिळालेल्या माहितीनुसार बड्या कर्जदारांकडुण सुरज जगदाळे यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे धमक्या देण्यात येत होत्या

श्री जगदाळे यांच्याशी जमाव करुण हुज्जत घालण्याचे आणि घाबरवण्याचे अनेक वेळा थक्कित कर्जदारांकडुण प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे हे कोणत्याही अमिषाला आणि दबावाला बळी पडत नसल्यामुळें हाताश निरास झालेल्या कर्ज बुडव्या पतसंस्थाचालक आणि कर्जदारांनी मिळुण शेवटी लाच लुच्चपत प्रतिबंधक कायद्या आडुण प्रमाणिकपणे काम करत असलेल्या श्री सुरज जगदाळे या आधिकाऱ्यास अडकवुण स्वताची कर्जातुन सुटका करण्याचे षडयंत्र रचल्याची पिडित ठेविदारां मध्ये जोरदार चर्चा आहे.

(कर्जदारांनी रचलेल्या षडयंत्रामुळे ठेवीदारां मध्ये असंतोषाची लाट )

बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट आणि पतसंस्था अवसायनात जाण्याचा मोठा प्रभाव दिसून येत आहे.

ठेवीदारांनी दीर्घ पाठपुरावा केल्याच्या नंतर प्रदीर्घ काळाने आवसायक रुजू होत आहेत वसुली प्रक्रियेने वेग धरल्या नंतर या प्रक्रिये मध्ये काहीनां काही अडथळे निर्माण करण्यात येत आहेत

राजस्थानी मल्टिस्टेट चार्ज सुरज जगदाळेंकडे होता त्यांच्या प्रमाणिक व अथक परिश्रमामुळे ठेवीदारांच्या बुडालेल्या ठेवी मिळण्यासाठी कुठेतरी अशेचे किरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते

नेमकी अंतिम सुनावणी होत असताना काही व्यवसायिकां कडुण ब्रेक लावण्याचे काम होताना दिसून येत आहे.

सहाय्यक आधिकारी माजलगाव सुरज जगदाळे प्रकरणात ज्या दिवशी वसुली दाखले 14 कोटी चे निर्गमित होणार होते त्याच दिवशी रेड कशी पडते ?

किंवा मग हा कट रचुन कारवाई करयात आली का ? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण कर्जदारांनी किंवा संचालकांनी ठरवुण केलेले कटकारस्थान नाकारता येत नाही

यामध्ये तक्रारदाराची पार्श्वभूमी तपासणी गरजेचे आहे कर्जदारांचे व तक्रारदाराचे सीडीआर चेक करणे गरजेचे आहे. सदरील प्रकरणातील तक्रारदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर तीन-तीन फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

सावकारी परवाना काढण्याकरता त्याने खोटी माहिती कार्यालयाला दिली की त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाहीत.
याच तक्रारदाराने चार महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील कॉन्स्टेबल यांची तक्रार करून त्यांना एसीबी प्रकरणात गुंतवले होते,

तेव्हा जे सापळा अधिकारी होते तेच सापळा अधिकारी जगदाळे यांच्या विरोधात कारवाई मध्ये सामील होते.
अनेक कर्जदारांकडून श्री जगदाळे यांना कर्ज आणि ठेवींच्या मॅचिंग बद्दल प्रस्ताव येऊन आमिष दाखवल्या जात होते..

परंतु श्री जगदाळे हे रुजू झाल्यापासून त्यांनी एकाही कर्जदाराचे मॅचिंगचे व्यवहार केलेले नव्हते.. सहकार कायद्यानुसार वसुलीला त्यांनी प्राधान्य दिलेले होते.

या प्रकरणांमध्ये असे प्रकार होत असतील तर इमानदार आधिकारी कसे पुढे येतील ? आणि मग पिडित ठेवीदारांच्या ठेवीचं काय ? आसा प्रश्न संबंध ठेविदारांकडुण उपस्थित केला जात आहे

या प्रकरणावर ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते श्री सेवकराम जाधव यांनी वेगवान मराठीला दिलेली प्रतिक्रीया खालील प्रमाणे 👇🏿

१) राजस्थानी मल्टी स्टेट च्या ठेवीदारांचा संघर्ष काही केल्या संपत नाही एक ना एक संकट पुढे येत आहे.

२) दोन वर्ष झाली सॉफ्ट्वेअर कॉपी मिळत नाही. एमपीआयडि प्रस्तावाबद्दल गृह खाते उदासीन आहे.

३) सुरज जगदाळे यांनी कर्ज वसुली करण्यासाठी जवळपास 1200 लोकांना नोटीस पाठवल्या आहेत.

४) येणार्‍या तीन महिन्यात ठेवीदारांच्या काही प्रमाणात ठेवी देण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते.

५) परंतु आता आपल्या पैशाच काय होईल ही भीती ठेवीदार मधे निर्माण झाली आहे.

६) हक्काचे पैसे मिळत नाहीत या भीतीपोटी काही ठेवीदारांनी मरणाला कवटाळले आहे.

७) आणखी किती जणांचे मरण या प्रशासनाला बघायचे आहेत ?

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!