परळी नगरपालीकेतील मारहाण प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या माजी नगसेवकावर गुन्हे दाखल

वेगवान मराठी परळी -केशव मुंडे दि 20/12/2024 / शुक्रवार -रोजी दुपारच्या सुमारास बीड जिल्ह्यातल्या परळी नगर पालिकेतील दलित समाजाच्या कर्मचाऱ्यास मुस्लिम समाजातील एका माजी नगसेवक व त्यांच्या साथीदारांनी मिळुण औन ड्युटी सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यास नगर पालिके मध्ये जाऊण शिवीगाळ करत मारहाण करून नगरपालीकेतील फर्नीचरची तोडफोड करत आसल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते,
या प्रकरणाची चौकशी केली तेंव्हा परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी नगसेवक अन्वर मिस्किन शेख (हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणुण ओळखले जातात) यांनी परळी नगर पालिकेच्या घरकुल विभागातील कर्मचारी शिध्दार्थ गायकवाड यांना नगरपालीकेत जाऊण शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आसुण या प्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 👇

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक
माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ
भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय – नौकरी
(MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे
शासकीय कामकाज करित असताना यातील
आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस
कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक
शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय
कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1)
अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3)
शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम
यांच्याविरुद्ध गुरन – 194/2024 कलम
132,121 (1), 352, 351 (2),351(3),3(5)
BNS सह कलम 3(1) (r) (s), 3(2) (va) अजाज
अप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पुढील तपास उपवीभागीय पोलीस
अधिकारी चार्ज गेवराई नीरज राजगुरु हे करीत
आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश
असलेले अन्वर मिश्कीन शेख हे माजी नगरसेवक
आहेत तर दुसरा एक आरोपी शेख अजीज
इस्माईल हे माजी नगरसेविकेचे पुत्र आहेत.