आश्रम शाळेतील शिक्षकांच्या उपोषणाचा पाचवा दिवस

शाहू फुले आंबेडकर अनुसुचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र
यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु आसलेल्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड -दिनांक 29 मार्च 2025 शनीवार l
आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य बीड
यांचे गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकार्यालय बीड येथे अमोल उपोषण सुरू असून
अद्याप पर्यंत प्रशासनाने यांची दखल घेतलेली नाही. उपोषण कर्त्यांनी अद्याप पर्यंत अन्न घेतलेले नाही परंतु जिल्हा प्रशासना कडुण कसल्याही प्रकारची दखल घेतली नसुण उलट उपोषन कर्त्यांना त्रास दिला जात आसल्याचे आरोप उपोषण कर्त्यांनी केले आहेत
आश्रम शाळा चालू आहेत 2006 ला महाराष्ट्र शासना कडुण या शाळांना मान्यता देण्यात आली आहे मान्यता देण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला, 2012 ला जिल्हाधिकार्यालय मार्फत तपासणी करण्यात आली
तसेच 16 मार्च 2015 ला शाळांची तपासणी करून अ ब क ड वर्गवारी करण्यात आली व याला शासनाने शाहू फुले आंबेडकर निवासी योजना असे नाव देऊन पात्र 165 आश्रम शाळा ८ मार्च 2019 ला 20 टक्के अनुदान देण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला
त्यानंतर जानेवारी 2020 तसेच ऑगस्ट 2023 मध्ये 500 गुणांची तपासणी करण्यात आली तरी शासनाने अनुदानित केलेले नाही म्हणून कर्मचारी वर्गावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे
राज्यातील शाहू फुले आंबेडकर निवासी 165 अनुजातीच्या आश्रम शाळांना व्हिजी एनटी संहितेनुसार वेतनश्रेणी प्रमाणे शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे
धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, आणि त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजु करुण घेण्यात यावे
अशा या उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत तरी प्रशासनाने योग्य ती वेळी दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य करून उपोषणाची दखल घ्यावी.