मनपसंती वाहण क्रमांक पाहीजे आसेल तर हि संधी सोडु नका

वेगवान मराठी केशव मुंडे  बीड, दि. 17 (प्रतिनिधी- .) :- परिवहनकक्ष दूचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका MH23BLही  सद्यस्थितीत सुरू असून सदर मालिकेतील नोंदणी क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी  MH23BM 0001 ते 9999 ही मालिका दिनांक 30 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे.

       ज्या वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावायचा असेल त्यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज आकर्षक क्रमांकला लागू असलेली  फीच्या रकमेचा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांच्या नावाचा धनादेश डी.डी व आपल्या ओळखपत्राच्या व आधार कार्डच्या साक्षांकीत प्रतिसह दिनांक 17 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2.00 पर्यंत कॅश काउंटर खिडकी क्रमांक 2  वर जमा करावा. सदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रिकानुसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या अर्जाची नोटीस दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दुपारी 4.00 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी एकपेक्षा जास्त अर्ज असलेल्या अर्जदारांनी दुपारी 1.00 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये मूळ शुल्का व्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश जमा केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोंदणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. तरी सर्व वाहन धारकांनी,नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वप्निल माने यांनी केले आहे.

                          ******

Back to top button
error: Content is protected !!