संजय गुंजाळ व नितिन सोनवणे यांच्या उपस्थितीत गरजु विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप

!!! बीड येथे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य वाटप सोहळा उत्साहात संपन् !!!

बीड, दि. २६ जुलै २०२५: गुरु आनंद महिला प्रतिष्ठान, बीड (अध्यक्ष: श्रीमती सीमा ओस्तवाल) आणि प्रयास फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. गणेश विद्यामंदिर, शिवाजीनगर, बीड येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ही संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असून, वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाद्वारे शिक्षणाला प्रोत्साहन देते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संजय गुंजाळ उपस्थित होते. यावेळी श्री. नितीन सोनवणे (महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना, बीड), समाज कार्यकर्ते श्री.अक्षय माने, संस्थेचे सदस्य श्री. रवि धोंडगे, मुख्याध्यापक श्री. उमेश पवार, तसेच श्रीमती मनीषा हरणमारे, वंदना पारवे, सुजाता सावंत, सविता जैन यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

मान्यवरांनी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने शुभेच्छा देताना शिक्षण आणि सामाजिक सहभागाच्या महत्त्वावर प्रेरणादायी संबोधन झाले.

संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करत असून, स्थानिक पातळीवर सामाजिक जागरूकता आणि समुदाय विकासासाठी सक्रिय आहे.

या उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करून शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

संस्थेचे हे कार्य वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्थानिक समुदायाला बळकटी देण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे

नितीन सोनवणे
महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष,
ऑल इंडिया पॅंथर सेना बीड.
मो. 9604957852

Back to top button
error: Content is protected !!