गुन्हेगारांच्या विरोधात बीड पोलीसांची मोठी कारवाई,

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान धारधार शस्त्र बाळगणारे इसमांवर शिवाजीनगर पोलीसांची धडक कारवाई

वेगवान मराठी बीड केशव मुंडे दिनांक 30/12/2024 रोजी 23:00 ते दिनांक 31/12/2024 रोजी 05:00 वा. पावेतो बीड जिल्ह्यात सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी आदेशीत केलेले होते.सदर आदेशाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड हद्दीत जय भवानी चौक येथे नाकाबंदी नेमण्यात आलेली होती.

सदर नाकाबंदी दरम्यान दिनांक 31/12/2024 रोजी 00:30 वा. चे सुमारास एक काळया रंगाची स्कार्पिओ गाडी जिचा पासीग क्र. MH 23 BH 6665 ही बीड शहरातील के.एस. के. कॉलेज ते बाशी नाकाकडे जात असतांना सदर वाहनांस नाकाबंदी दरम्यान जय भवानी चोक, बीड येथे थांबवुन तिची तपासणी केली असता

सदर वाहनामध्ये 1) एक धारधार कुकरी 2) एक धारधार बटनाचा चाकु व 3) एक हिट बॅट लाकडी असे घातक व धारधार शस्त्र विना परवाना बाळगलेले मिळून आल्याने त्याचा पंचनामा करुन सदर स्कार्पिओ वाहन MH-23 BH 6665 जप्त करुन सदर स्कार्पिओ चे मालक कृष्णा सायलु संकोड वय 25 वर्षे व चालक दिपक चंदर शेगुरे वय 20 वर्षे दोन्ही रा.पांगर बावडी ता.जि.बीड यांचे विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, बोड येथे विना परवाना घातक व धारधार शस्त्र बाळगले वरुन गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोना/1863 मच्छिद्र कप्पे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वंभर गोल्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. मारोती खेडकर, महिला पोलीस उपनिरीक्षक दामधर, पोना/1863 कप्पे, पोशि/ बहिरवाळ, पोशि/280 शेळके व RCP पथक चे अंमलदार भोसले, घुंगरड, घुले, चांदणे, नवले व सोनकांबळे यांनी केलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!