क्राईमबीड

ठेवीदारांच्या ठेवींवर जगणाऱ्या दलालांनी मला पत्रकारिता शिकवु नये -केशव मुंडे

Brokers who eat the butter from the depositors' farm should not teach me journalism - Keshav Munde

सामाजिक जाण ठेवून पत्रकारिता करणाऱ्या केशव मुंडें सारख्या पत्रकारावर खोटे आरोप करणे म्हणजे सुर्यावर थुंकणे !! राजेश झंवर यांनी तारतम्य बाळगून बोलावे – श्री सेवक राम जाधव

परळी वैजनाथ प्रतिनिधी दिनांक १ मे २०२६———बंद पडलेल्या मल्टिस्टेट / पत संस्थेच्या ठेवीदारांचा लढा आम्ही लढत आहोत. माहेश्वरी पतसंस्था बंद पडल्याचे सद्यातरी आमच्या ऐकिवात नाही. तिकडे आम्हाला वळवू नका.

ठेवीदारांच्या वेदना तुमच्या सारख्या संस्थेच्या मालकांना कळणार नाहीत.अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली..

अनेकजण ठेविंच्या धसकीने मेले आहेत. त्या वेदनांची जाणीव तुम्हाला काय कळणार ?

वेगवान मराठीच्या माध्यमातून उपसंपादक केशवराव मुंडे हे ठेवीदारांचा आवाज बनत डोळ्यात तेल घालून अहोरात्र काम करत आहेत.

तुमच्या विरोधात जे पी बियाणी यांनी दिल्या गेलेल्या निवेदनाची बातमी लावणे, याला सुपारी म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येत आहे. सुपारीची सवय तुम्हाला असेल पत्रकार केशवराव मुंडे यांना नाही.

ठेविदार कृती समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते– सेवकराम जाधव.
——————————————–

 

परळी प्रतिनिधी दिनांक 1 मे 2026 – बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पतसंस्था मध्ये मागील दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणं आतापर्यंत उघडकीस येताना दिसुन येत आहेत…

दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजे 6 महिन्यांपूर्वी परळी वैजनाथ येथील जयप्रकाश बियाणी यांनी परळी शहरातील माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थे मध्ये गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि सहकार विभागाकडे केली होती…

या तक्रारीची प्रत वेगवान मराठी स प्रसिद्ध करण्यासाठी प्राप्त झाली होती,याच तक्रारीस वेगवान मराठी च्या सोशल मीडिया वरुण प्रसारित करण्यात आले होते..

विषय असा आहे की माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने त्यावेळी कोणत्याही प्रकारचा खुलासा किंवा स्पष्टीकरण दिले नव्हते…

आता सहा महिन्यानंतर संस्थेला साक्षात्कार झाला आहे कि मिस्टर जे पी बियाणी आणि अभिषेक बियाणी यांनी मला सुपारी दिली आणि मि त्यांची खोटी बदनामी केली…

एकतर माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेवर माझी किंवा आमच्या नेटवर्क ची ना तक्रार आहे किंवा ना आम्ही तसा दावा केलेला आहे…

केवळ मिस्टर जे पी बियाणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीची माहिती नागरिकांना दिली आहे एक जबाबदार पत्रकार म्हणून नागरीकांना घडणाऱ्या घटनांची माहिती निर्भिडपणे देणं हे मिडीयाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तृत्व आम्ही पार पाडले या व्यतिरिक्त या घटनेशी बियाणीशी किंवा माहेश्वरी संस्थेशी आमचा / माझा कसलाही संबंध नाही…

संबंधित तक्रारी वर पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, व सहकार विभागाच्या सही आणि शिकक्यांची मोहर आहे..

मग मिडिया म्हणून एक पत्रकार म्हणून आमची / माझी प्रकरणास जनते समोर आणले यात गैर काय आहे हे समजण्या इतके बालिश संस्थाचालक असतील असं वाटत नाही आणि असतील तर नाकारता पण येत नाही…

वेगवान मराठी हे नेटवर्क पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करते ,

वंचित पिडित आणि शेवटच्या घटकातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवणारे नेटवर्क म्हणून संबंध महाराष्ट्रात वेगवान मराठी च्या नेटवर्क ची विश्वासार्हता आहे…

बीड जिल्ह्यासह राज्यातील लाखो गोरगरीबांच्या ठेवी पतसंस्थेंनी बुडविल्या मुळे लाखो कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले आहेत, यामध्ये आणखी भर पडु नये आणि या धक्क्यातून लोकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलु नये या सामाजिक बांधिलकीतुन आम्ही मागील दोन वर्षांपासून ठेवीदारांचा लढा लढत आहेत…

यामध्ये राज्याचे नेतृत्व सचिन उबाळे तर परळी तालुक्यातील ठेवीदारांचा लढा हा सामाजिक कार्यकर्ते श्री सेवक राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत …

या लढ्यात सुरुवाती पासूनच वेगवान मराठी नेटवर्क आणि माझा सक्रिय सहभाग होता, आहे आणि शेवटच्या ठेवीदारांच्या ठेवी मिळे पर्यंत राहिलं…

आशा बिनबुडाच्या आरोपांना आणि गिधाड भपक्यांना आम्ही भिक घालत नाही , कारण आम्ही विनाकारण कोणावर बोलत नाहीत आणि कारणा विना लिहित नाहीत तसेच असामाजिक कृत्य करणारांना सोडत पण नाहीत…

बियाणी आणि माहेश्वरी संस्थेचे काय लफडे कुटाणे,देवान,घेवान आहे त्याच्याशी माझा संबंध नाही कारण मागील दोन वर्षांपासून बियाणी च्या विरोधातच आम्ही लढा देत आहोत..

कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा अपभ्रंश करून घेऊन माझा आणि माझ्या नेटवर्क चा उल्लेख करण्या ऐवजी आपण स्वतः ची भुमिका मिडिया समोर ठेवणे आवश्यक होते…

बियाणी यांनी केलेले आरोप खरे की खोटे किंवा माहेश्वरी संस्थेत काय चाललंय तो निकाली काढणे न्यायालयाचा विषय आहे मिडिया चा नाही…

त्यामुळे माहेश्वरी चा विषय हा बियाणी विरुद्ध तुमचा आहे त्यामध्ये मिडीयाला मध्ये घेण्याचा संबंध नाही कारण घटणा घडल्या नंतर त्याचे वार्तांकन मिडिया वर होत असते याची जाणीव करून घ्या

दुसरं महत्त्वाचं म्हणजे बियाणी कडे स्वतःचे दैनिक आणि अनेक पगारी पत्रकार असताना स्वतःच दिवाळखोरीत निघालेलं कुटुंब इतरांना सुपाऱ्या का देईल ?

याचा अर्थ चोराच्या मनात चांदणं या म्हणी प्रमाणे होतो ” कारण ति सुपारीच सवय तुम्हाला असेल मला नाही ” मागील पंधरा वर्षा पासून पत्रकारिता करत आहे आणि या कालखंडात पत्रकार म्हणून कोणाच्याही चहाच्या कपात देखील केशव मुंडे मिंदा नाही तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मला सुपारी देणारा आणखी जन्माला आला नाही…

आणि असेल तर माझे उघड आव्हान आहे समोर या.उगाच तुमच्या पापात मला सामिल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका पश्चात्तापा शिवाय हाती काहीच लागणार नाही …

आणि शेवटी एक सांगतो ठेविदारांच्या मढ्यावरचं लोणी खाणाऱ्या दलालांनी मला पत्रकारिता शिकवु नये …

दुसरं म्हणजे सुपारी दिलेलं शिद्ध करा किंवा फिर्यादी जे पी बियाणी यांनी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर तुमच्या संस्थेवर बातमी किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे दाखवा अन्यथा जाहीर माफी मागा …

केशव मुंडे उप संपादक वेगवान मराठी नेटवर्क

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!