
!! पत्नी,मेव्हणी, साडु यांनी मिळून थंड डोक्याने 8 महिण्यापर्वी केलेला खुन गेवराई पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करून केला उघड..!!
!! प्रेताची विल्हेवाट लावण्यात अल्पवयीन मुलांचा ही सहभाग !! प्रथम ऊसाच्या फडात आणि नंतर गोदावरीच्या पात्रात बाईकसह प्रेत दिले टाकुण !!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 5 हे 2026 – पोलीस ठाणे गेवराई हद्दील पांढरवाडी फाट्यावरील कचरा डेपो जवळ दिनांक 03.09.2025 रोजीचे रात्री ते दिनांक 06.09.2025 रोजी दरम्यान उध्दव तुकाराम शिंदे वय 50 वर्ष व त्यांची पत्नी संगिता हे पत्ती पत्नी दोन चाकी मोटार सायकलवरून पुणे येथून गेवराई पांढरवाडी येथे त्यांचे नातेवाईक 01) सविता विषणु वाजे, (02) विष्णु कोंडीबा वाजे, यांना भेटण्यासाठी पांढरवाडी गेवराई येथे आले होते.
उध्दव तुकारात शिंदे हे नेहमी त्यांच्या पत्नीला त्रास देऊन भांडण तंटा करून मारहण करीत होता
दिनांक 06.09.2025 रोजी परत उध्दव शिंदे व संगीता शिंदे यांच्यात परत भांडण झाले तो वाद विकोपाला गेल्याने संगीता शिंदे हिने तीची बहिण सविता व भाऊजी विष्णु वाजे यांच्या मदतीने गळा आवळून उध्दव शिंदे याचा खुन केला.
मयताचा साडु विष्णु शिंदे याने त्याच्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रेत जवळील उसाच्या शेतात टाकून दिले.
सदर प्रेताचा वास येत असल्याने विष्णु शिंदे व त्याचा अल्पवयीन मुलगा यांनी दोन-तीन दिवसांनी सदर प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने प्रेत भोतात (गोणीपासून तयार केलेले) टाकून मोटार सायकलवर शहागड येथील जुण्या पुलावरून गोदवरी नदीत टाकून दिले.
त्यानंतर दोन दिवसाने मयताची मोटार सायकल विष्णु वाजे व त्याचा अल्पवयील मुलगा यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या मदतीने शहागडच्या जुण्या पुलावरून गोववारी नदीतपात्रात टाकून दिली.
या खुणातील मुख्य आरोपी मयताची पत्नी संगीता उध्दव शिंदे हिने आपले बिंग फुटू नये म्हणून सिंहगड पोलीस ठाणे पुणे आयुक्तालय येथे आपला नवरा उध्दव शिंदे हरवल्याबावत मिसिंग तक्रार दाखल केली,
सदर तपासत काल दिनांक 02.05.2026 रोजी पुणे आयुक्तालयातील एक अंमलदार व मयातचा मुलगा शभम शिंदे असे पोलीस ठाणे गेवराई येथे आले होते.
शुभत शिंदे याने माझ्या वडीलाचे काही बरे वाईट झाले असावे अशी शंका गेवराई पोलीसांपुढे उपस्थीत केल्याने
पोनि किशोर पवार यांनी मा. नवनी कौवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री. सचीन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड, श्री. अनील कटके, उप विभागीय पोलीस अधिकरी, गेवराई
यांना सदर घटनेबाबत माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गेवराई पोलीसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पथकासह तात्काळ पांढरवाडी गेवराई येथे राहत असलेले विष्णु वाझे, सविता वाजे यांना ताब्यात घेऊन त्याचंकडे स्वतंत्र विचारपूस केली असता
प्रथम त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली त्यावर पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी त्यांना पोलीस खाक्या दाखवताच आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हा त्यांनी त्यांची दोन अल्पवयीन मुलांना पालकांसमक्ष विचारपूस करून गुन्हा उपडकीस आण्यास मदत घेण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयातची पत्नी संगीता उध्दव शिंदे यांच्या मदतीने खुण करून प्रेत व मोटार सायकल गोदावरी पात्रात टाकल्याचे कबुल केले.
मुख्य आरोपी संगीता उध्दव शिंदे हिला पोलीस ठाणे पुणे आयुक्तालय अधिकारी व पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर प्रकरणात मयताचा मुलग शुभम उध्दव शिंदे याच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गेवराई येथे गु.र.नं. 268/2026 कलम 103(1), 238, 66(2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास श्री. दिपक लंके, सपोनि पोलीस ठाणे गेवराई हे करीत आहेत.
या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 03 आरोपीतांना अटक करण्यात आली असून गोदावरी नदीत मयताच्या मोटार सायकलचा सांगाडा मिळून आला आहे.
सदर कारवाई मा.नवतीत काँवत, पोलीस अधीक्षक, श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री. अनिल कटके, उप विभागीय पोलीस अधीकारी उप विभाग गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री. किशोर पवार, पोलीस निरीक्षक गेवराई, सपोनि, दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, सपोनि. अण्णासाहेब पवार, पोउपनि. प्रदीप आढाव, पोउपनि उदगीरकर, श्रेणी. पोउपनि, सुरेश पारधी, श्रेणी. पोउपनि इसाक शेख, सफौ/894 राजु भिसे, पोह/223 कल्याण राठोड, पोह/1327 राऊत, पोह/1317 चंद्रसेन माळी, पोह/2026 सुंदर राठोड, पोकी/ 241 गोरक्ष डोके, पोकों/2198 धिरज खांडेकर, पोकों/2112 जितेंद्र ओव्हाळ, पोकी 392 दिनेश ढाकणे, पोकी 1001 महादेव कदम, मपोह/1706 रेखा तुपे, मपोह 1436 रेशमा पौळे यांनी सहभाग घेतला.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








