बीड

मराठा भवना साठी परळी न.पा कडे जागाच नाही !!

Parli Municipality has no space for Maratha Bhavan!! The disgrace of Chhatrapati's community, the misfortune of Maharashtra

!! मराठा भवन” विषयी सोमवार पासून नगर परिषद समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन !!

!! मिळवल्या शिवाय आता माघार नाही !! सकल मराठा समाजाचा निर्धार !!

परळी वैजनाथ वेगवान मराठी प्रतिनिधी : केशव डि.मुंडे दिनांक 9 मे 2026 – ज्या राजा ने सर्व जाती धर्मातील लोकांच्या डोक्यावर सुरक्षेचं छत्र धरले !! ज्या मातेने स्वराज्य रक्षणासाठी बाल वयातच शिवबाला रणांगणात उतरवले आज त्याच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ च्या लेकरांना मराठा भवनासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ परळी नगरपालिकेने आणली आहे हे संबंध महाराष्ट्राचे दुर्दैव म्हटले तर वावगे ठरणार नाही 

प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाला मराठा भवनासाठी जागा आणि भवन बांधून देण्याचे आश्वासन देऊन मराठ्यांचे मतं घेणारे निवडणूका जिंकल्या नंतर मिस्टर इंडिया होतात 

परंतु आता परळीतील मराठा समाज आक्रमक भूमिकेत दिसुन येत असून या वेळी आर या पार ची लढाई लढण्याच्या तयारीने परळी नगर पालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे 

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. च्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था दिसून येत आहे.

त्यामुळे सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

परळी शहरात “मराठा भवन” उभारण्यासाठी जागेच्या संर्भात नगर पालिकेकडे अनेक वर्षापासून
मागणी केली जात होती.

दि. ७ मे २०२३ रोजी मराठा समाजाच्या झालेल्या व्यापक बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा सद्याचे परळीचे आ.धनंजय मुंडे यांनी मराठा भवन बनवण्यासाठी साठी पंडित दिनदयाल उद्यान,औद्योगिक वसाहत येथील जागा देण्याचे नगर पालिकेस आदेशीत केले होते.

तशा स्वरूपाची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली होती. मराठा समाजाकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत पण केल्या गेले होते.
——————————————–
मात्र नंतर प्रस्तावित “मराठा भवन” जागेच्या बाबतीत कुठे माशी शिंकली कळलेच नाही. अचानक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गार्डन कसे काय बनवले ? नगर परिषदेच्या जागेत त्यांच्या परवानगी शिवाय ते बनवले का ? नगर परिषद प्रशासनास याची कल्पनाच नाही का ? एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.
——————————————–

दुसरा विषय असा की परळी शहरातील राजमाता जिजामाता उद्यानाचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत.

सदरील उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर बालशिवबा सहित जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समस्त परळीकरांकडून वारंवार करण्यात आली होती.

जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यासाठी तशा स्वरूपाचे बेसमेंट पण करण्यात आले आहे.

मात्र नगर पालिकेस मुहूर्त का सापडत नसेल ? परळीकरांना हा प्रश्न पडला आहे.
तब्बल तीन वर्षाची मागणी अद्याप पर्यंत पूर्ण केली जात नाही.

ठिय्या आंदोलनाचे निवेदन देऊन एक महिना उलटला परंतु त्याकडे न. प. कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केल्या गेले.

आता आमच्याकडे आंदोलना शिवाय पर्याय उरला नाही. असे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!