नवनीत कॉवत यांनी अवैध व्यवसायिकांच्या आणले नाकी 9

वेगवान मराठी बीड के डी.मुंडे  दि. 18/01/2024

  • युसूफ वडगाव पोलीसांची कामगिरी, ! पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध व्यवसायिकांच्या आणले नाकी 9 !

दिनांक 18/01/2025 रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे बनसारोळा येथे एका बोलेरो जीप मधून टॅंगो संत्रा दारूची वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती. सदर माहितीवरून युसुफ वडगाव पोलिसांनी सदर जीपची तपासणी केली असता …

सदर जीपमध्ये 17,500/- किमतीची टॅंगो संत्रा देशी दारू अवैधपणे वाहतूक करत असताना चैतन्य बाबासाहेब रांजणकर, रा. युसूफ वडगाव हा मिळून आला. त्याच्यावरती युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून अवैध पद्धतीने विकली जाणारी दारू व दारू वाहतुकीसाठी वापरली गेलेली बोलेरो जीप असा एकूण 2,17,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच पोउनि बसवेश्वर चनशेट्टी व इतर अंमलदार हे युसुफ वडगांव पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आवसगाव शिवारात केलेल्या वाहन तपासणी मध्ये मुजफ्फर गफार तांबोळी,रा.केज हा त्याचेकडील स्विफ्ट डिझायर गाडीत विमल, बाओबाजी, गोवा, आरएमडी असा 12585/- रू. किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा विक्री साठी वाहतूक करताना आढळून आला.

सदर इसमास 2,12,285/- रू चे मुद्देमाल व कारसह घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनी मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोउपनि बसवेश्वर चनशेट्टी, पोलीस शिपाई बालासाहेब घोरपडे, पोलिस शिपाई नितीन अतकरे पोलीस शिपाई महादेव केदार, चालक पोलीस शिपाई सादीक आतार यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!